जळगाव: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर या एका महत्त्वाच्या नगर पंचायतीचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगर पंचायतीचा निकाल
1. मुक्ताईनगर
मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निकालाचे अपडेट:
मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
----
मुक्ताईनगर नगर पंचायतीसाठी एकूण 64 टक्के मतदान झालं.
- मुक्ताईनगरमधील कोथळी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शेवटच्या एक तासात मोठा राडा
नगरपरिषद निवडणूक 2025 याची आज मतदान प्रक्रिया पार पडली. शेवटच्या एक तासांमध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील कोथळी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या केंद्रावर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना माहिती मिळताच त्यांनी कोथळी येथील मतदान केंद्रावर भेट घेतली. यावेळी मतदान केंद्रावरील तणावाचे वातावरण झाले होते. पोलीस बंदोबस्त मोठा प्रमाणात लावण्यात आला असून पोलिसांनी हस्तक्षेप करत झालेला वाद शांत केला आहे. घडलेल्या घटनेसंदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात असून पुढील तपास पोलीस करत आहे.
- मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे आले समोरासमोर
केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी आरोप केला आहे की, आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते गुंडागिरी करत आहे. तर दुसरीकडे रक्षा खडसे यांच्या कार्यकर्त्यांकडून बोगस मतदान करण्यात येत असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यावेळी या मतदान केंद्राबाहेर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
ADVERTISEMENT











