NCP : शरद पवारांना बघून अजित पवारांनी वाटच बदलली; कार्यक्रमात काय घडलं?

मुंबई तक

01 Aug 2023 (अपडेटेड: 01 Aug 2023, 12:34 PM)

नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आलेल्या टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने आले, पण अजित पवारांनी भेट घेणे टाळले.

Lokmanya Tilak Award deputy chief minister ajit pawar skipped to meet sharad pawar in tilak award event.

Lokmanya Tilak Award deputy chief minister ajit pawar skipped to meet sharad pawar in tilak award event.

follow google news

Sharad Pawar Ajit Pawar News : शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील कार्यक्रमात समोरासमोर आल्यानंतर काय घडणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आणि पुण्यातील या कार्यक्रमात घडलंही तसंच. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार हे एका मंचावर आले. यावेळी काका शरद पवार यांना समोर बघून आपली वाटच बदलली. नेमकं काय घडलं, हेच समजून घ्या. (what happened when sharad pawar and ajit pawar confront in program)

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे प्रथमच एका व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवारांना समोर बघून अजित पवारांनी जी कृती केली, तिची चांगलीच चर्चा होत आहे.

शरद पवार-अजित पवारांमध्ये व्यासपीठावर काय घडले?

झालं असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकटेच व्यासपीठावर येऊन बसले. शरद पवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होण्यापूर्वी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यासपीठाकडे आले.

व्यासपीठावर शरद पवार हे पुढच्या रांगेतील आसनावर बसलेले होते. राज्यपाल बैस, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांजवळ आले आणि त्यांना हस्तांदोलन करत पुढे गेले. पण, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मागे अजित पवार हे होते. त्यांनी व्यासपीठावर येताच पुढून न मार्ग बददला.

वाचा >> PM Modi in Pune : ‘सर्जिकल स्ट्राईक’… शरद पवारांनी मोदींना कोणता इतिहास सांगितला?

अजित पवार हे व्यासपीठावर शरद पवार यांच्या मागे ठेवलेल्या आसनाच्या मागून पुढे चालत गेले. यावेळी अजित पवारांचं पूर्ण लक्ष शरद पवार यांच्याकडे होते.

वाचा >> ‘साहेब आणि दादा आजही एकत्रच’, अजित पवारांचं शरद पवारांबद्दल भुवया उंचावणारं विधान

त्यांनी शरद पवार यांना भेटणं टाळण्यासाठी मार्ग बददला आणि शरद पवारांच्या पाठीमागून जात आपल्या आसनावर जाऊन बसले. यावेळी शरद पवारांचं मात्र अजित पवारांकडे लक्ष नव्हतं. ते समोरून आलेल्या राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांना हस्तांदोलन करत होते.

वाचा >> Narendra Modi Pune visit :शरद पवार एकटेच बसले, मोदी पुण्यात आल्यानंतर काय घडलं?

हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. अजित पवार हे बंडानंतर एकदा सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांना भेटले होते. इतकंच नाही, तर एकदा त्यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत, तर दुसऱ्यांदा त्यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांसह शरद पवारांना भेटले होते. मात्र, पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांना भेटणं टाळलं.

    follow whatsapp