Ajit Pawar: ‘PM मोदींविरोधात सभा घेऊन…’,बारामतीतून अजित पवार काय म्हणाले?

प्रशांत गोमाणे

26 Aug 2023 (अपडेटेड: 26 Aug 2023, 04:57 PM)

मी अनेक सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घेतल्या आणि त्यांच्या कामकाजावर टिका केली. पण त्यावेळी लक्षात आले नाही, पुढे इतके चांगले काम होणार आहे,असे अजित पवार यांनी सांगितले.

ajit pawar rally in baramati pm narendra modi sharad pawar maharashtra politics

ajit pawar rally in baramati pm narendra modi sharad pawar maharashtra politics

follow google news

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर आज पहिल्यांदाच अजित पवार यांनी बारामती सभा घेतली. या सभेआधी त्यांनी बारामतीत मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले होते. या शक्तीप्रदर्शनानंतर बारामतीकरांशी संवाद साधताना अतित पवारांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. यावेळी अजित पवार यांनी बारामतीतून पंतप्रधानांवर टीका केल्याची आठवण काढत, आपण भूमिका का बदलली याची जनतेला माहिती दिली.(ajit pawar rally in baramati pm narendra modi sharad pawar maharashtra politics)

हे वाचलं का?

1991 पासून बारामतीकरांनी मला एवढं प्रेम दिलंय. माझ्यावर कुटुंबाप्रमाणे प्रेम केल्याचे अजित पवार यांनी सुरूवातीला सांगितले. मी अनेक सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घेतल्या आणि त्यांच्या कामकाजावर टिका केली. पण त्यावेळी लक्षात आले नाही, पुढे इतके चांगले काम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ताकदीचा दुसरा नेता मला दिसन नाही, असे सांगत अजित दादांनी आपली सत्तेत सामील होण्याची भूमिका सांगितली.

हे ही वाचा : Crime: लव्ह्, सेक्स आणि धर्मांतर! अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?

तसेच काही कटू निर्णय घ्यावे लागतात. पण हे निर्णय बारामतीच्या विकासासाठी घेतले. त्यामुळे आज बारामती डोळ्यासमोर ठेवा. बारामती फलटण रस्त्याचं काम मंजूर झालं आहे. हे 700 कोटी रूपयांच काम असून चार पदरी रस्ता हेणार आहे, अशी माहिती देत अजित पवार यांनी आता राज्यभर सभा घ्याव्या लागणार आहेत. मी भूमिका घेतलीय ती मला महाराष्ट्राला सांगायची आहे, असे देखील अजित दादांनी स्पष्ट केले.

रोज पहाटे बावचळून उठतो…

अजित पवार पुढे म्हणाले, तुम्ही सगळे पाहताय, करोडो रूपयांची कामे चालली आहेत. हे तुमच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे करू शकलो आहे. तुम्ही एवढा बोजा खांद्यावर टाकता. विधानसभा निवडणूकीत 1 लाख 68 हजार मताधिक्य दिलंत आणि समोरच्यांचे डिपॉझिट जप्त केलंत, आता अस केल्यावर मी काय करायचं.म्हणून पहाटे 5 वाजताच बावचळून उठून कामाला लागतो. बायको म्हणते जरा वयाचा विचार करा, पण यातून वेगळं समाधान मिळतं असल्याचे अजित दादांनी यावेळी सांगितले.

आता उद्या पावणे सहाला कुठंतरी साईटवर असेन, त्यावेळी तुम्ही मस्तपैकी चांगल्या झोपेत असाल…यामुळे बारामतीकरांना त्रास होत नाही. मी जर 10 वाजता साईटवर गेलो, तर तुम्ही इतकी गर्दी करता की मला काम पाहताच येत नाही, त्यामुळे तुम्ही पांघरूनात असताना बघून टाकायचं, मग सूचना देता येतात,असे देखील अजित पवार यांनी सांगितले.

    follow whatsapp