Aamshya Padavi : ठाकरेंना शिंदेंचे दोन झटके; जिल्हाप्रमुखानंतर आमदारही शिंदेंच्या सेनेत

ऋत्विक भालेकर

17 Mar 2024 (अपडेटेड: 17 Mar 2024, 03:07 PM)

amsha padvi News : विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. कल्याणचे जिल्हाप्रमुख बोडारे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेस केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्याने नंदुरबारमध्ये मोठा झटका बसला आहे.

आमश्या पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

follow google news

Uddhav Thackeray Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आता आमदार आमश्या पाडवी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला आहे. (MLC Amsha Padvi Joined Eknath shinde's shiv sena)

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जोरात तयारी सुरू आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना कल्याणमध्ये झटका दिला आहे. कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. 

आमश्या पाडवी यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे यांना नंदुरबार जिल्ह्यातही धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात होते.

हेही वाचा >> "उद्धव ठाकरे धाडस दाखवणार का?", भाजपने दाखवला बाळासाहेबांचा व्हिडीओ

रविवारी (17 मार्च) दुपारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमश्या पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिवसेनेचा महत्त्वाचा चेहरा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेत काम करत आहेत. 2022 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेत त्यांना उमेदवारी दिली होती. 

ठाकरेंना कल्याणमध्ये धक्का

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी शनिवारी (१६ मार्च) शिंदे यांच्या शिवसेनेत आपली पत्नी शितल बोडारे तसेच इतर कार्यकर्त्यांसोबत वर्षा बंगल्यावर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.

हेही वाचा >> महाविकास आघाडीची 'वंचित'शिवाय लोकसभेची तयारी, फॉर्म्युला ठरला! 

चंद्रकांत बोडारे यांचे लहान बंधू धनंजय बोडारे हे उद्धव ठाकरे गटात आहेत. चंद्रकांत बोडारे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंना झटका असल्याचे मानले जात आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पक्ष प्रवेशाप्रसंगी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
 

    follow whatsapp