"उद्धव ठाकरे धाडस दाखवणार का?", भाजपने दाखवला बाळासाहेबांचा व्हिडीओ

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

भाजपने उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या मुद्द्यावरून घेरले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना काही सवाल केले आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंची काँग्रेससोबतच्या आघाडीवरून कोंडी

point

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे सवाल

point

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरून टीका

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानिमित्ताने इंडिया आघाडीतील नेते एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंही हजर असणार असून, त्यापूर्वीच भाजपने ठाकरेंना घेरले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

ADVERTISEMENT

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने इंडिया आघाडी शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. पण, भाजपने काही प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडले आहे. भाजपची म्हणणं काय आहे, हे समजून घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ही पोस्ट वाचा...

बावनकुळे यांचे ठाकरेंना सवाल... 

"शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे, असे समीकरण यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता." 

हे वाचलं का?

"याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली."

हेही वाचा >> वाराणसी ते बारामती... 19 हाय व्होल्टेज जागांवर निवडणूक कधी?

"शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,' असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही का करीत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का? वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे."

ADVERTISEMENT

"आज ‘न्याय यात्रेची’ नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी याच शिवतीर्थावर येणार आहेत. आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? हाच प्रश्न आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे विसरले असतील तर काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते ते ऐकाच."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> महाविकास आघाडीची 'वंचित'शिवाय लोकसभेची तयारी, फॉर्म्युला ठरला!

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना काँग्रेससोबत जाण्यावरून घेरले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसबद्दलची भूमिका काय होती, याचाही व्हिडीओही बावनकुळेंनी शेअर केला आहे. आता यावर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात, ते बघावं लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT