Ashish Shelar : ‘सलीम-जावेद मोठे असतील, पण मराठी कलाकार…’, भाजपाचा राज ठाकरेंना टोला

प्रशांत गोमाणे

• 04:49 AM • 11 Nov 2023

दीपोत्सवाच्या धर्तीवर भाजपाने नमोत्सव हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर उपस्थितीत होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आशिष शेलारांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले होते

ashish shelar slams raj thackeray mns deepotsav with salim javed sandeep deshpande

ashish shelar slams raj thackeray mns deepotsav with salim javed sandeep deshpande

follow google news

Ashish Shelar slams Raj Thackeray : मनसेचा नुकताच शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा केला. या दीपोत्सवाचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि सलीम खान य़ांच्या हस्ते उद्घाटन झाले. या दीपोत्सवाच्या कार्यक्रमावरून आता भाजपा नेते, आमदार अॅड आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सणसणीत टोला मारलाय. मुंबईत एक दीपोत्सव सलिम -जावेद यांच्या उपस्थितीत पार पडला, तर दुसरा नमो उत्सव मराठी कलावंतासोबत सुरु होतोय, असे विधान करुन शेलारांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लक्ष्य केले आहे. यावर आता मनसे नेत्यांनीही आशिष शेलारांवर (Ashish Shelar) टीकेची झोड उठवली आहे. (ashish shelar slams raj thackeray mns deepotsav with salim javed sandeep deshpande)

हे वाचलं का?

आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर केलेल्या या टीकेवर आता मनसे नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठी बद्दल एवढं प्रेम असेल तर गुजराती पंतप्रधान ऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा. एवढं बोलायची देखील हिम्मत दाखवतील का?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच मराठी कलाकारांवर ज्यावेळेस अन्याय होतो, तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभे राहतं? असा सवाल देखील देशपांडे यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा : Sikander Shaikh : सिकंदर शेख ठरला ‘महाराष्ट्र केसरी’! अवघ्या 30 सेकंदात प्रतिस्पर्ध्याला केलं चितपट

आशिष शेलारांच विधान काय?

दीपोत्सवाच्या धर्तीवर भाजपाने नमोत्सव हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर उपस्थितीत होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आशिष शेलारांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले होते. जे कार्यक्रम दिपोत्सवाचे होतील ते कुणीही करो, कोणत्याही पक्षाने करो ते स्वागतार्ह आहे, असे शेलार म्हणाले.

कलाकार हा कलाकार असतो, त्याला जात, धर्म, भाषा भेद नसते. काल एका दीपोत्सवाचं उद्घाटन सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत झाले आणि आज आम्ही उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत करतोय. आता मराठीचा प्रश्न कोणी कुणाला करावा हा प्रश्न, असा सवाल शेलारांनी राज ठाकरेंना केला. काल करणाऱ्यांनी त्यांची टीमकी वाजवून घेतली, सलीम जावेदला घेऊन. ते अर्थात मोठे कलाकार आहेत, पण आमचे मराठी कलाकार छोटे नाहियेत. म्हणून मराठी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा दिपोत्सव आणि नमोत्सव झाला पाहिजे, असा टोला शेलारांनी राज ठाकरेंना लगावला होता.

हे ही वाचा : Uddhav Thackery : सरन्यायाधीशांबद्दल बोलणं भोवणार, ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

तिसरे तर अजून घराबाहेरच पडले नाहीत.त्यामुळे बसले आहेत की उठले आहेत, हेच कळत नाही. त्यांनी ही दिवाळीचे कार्यक्रम करावेत, अशी टीका आशिष शेलारांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली. शेलारांच्या या टीकेवर आता मनसे नेते आक्रमक झाले आहेत.

    follow whatsapp