अशोक खरात प्रकरण: 2 मित्र, 2 FIR आणि कंबरेजवळ घेतलेले पाय.. खळबळ उडवून देणारी Inside Story

Ashok Kharat Inside Story: अशोक खरात प्रकरण आणि रुपाली चाकणकर यांचा राजीनामा यामागची 'इन्साईड स्टोरी' जाणून घ्या अत्यंत सविस्तररपणे.

ashok kharat case 2 friends 2 fir and a 2 legs positioned near the waist sensational inside story

अशोक खरात प्रकरण Inside Story

ओमकार वाबळे

21 Mar 2026 (अपडेटेड: 21 Mar 2026, 08:33 PM)

follow google news

नाशिक: रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला असून आता अशोक खरात प्रकरणाबाबत सविस्तर बोलूया.. फक्त या स्टोरीच्या आधी पात्र, रेफरन्सेस आणि घटनाक्रम या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरून तुम्हाला सगळ्याचा हळूहळू उलगडा होईल.

हे वाचलं का?

अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी Inside Story

  • गोष्ट क्रमांक 1 - दोन मित्र आहेत.. एक मुंबईचा आणि एक पुण्याचा.. यातील एक जण हा अशोक खरातकडे कायम असायचा. म्हणजे तुम्ही पाय धुतानाचा फोटो वैगरे जरी पाहिला तरी त्यातही तो व्यक्ती तुम्हाला मागे बसलेला दिसेल. 

दुसरा आणखी एक मित्र आहे तो सुद्धा अशोक खरातच्या संपर्कात असायचा. या दोघांपैकी एका मित्राच्या हाती अशोक खरातचे सगळे व्हिडिओ लागले, काही फोटोही मिळाले. त्याने हे दुसऱ्या मित्राला सांगितलं. 

हे दोघं गेले पुण्यातील एका महिला कार्यकर्त्याकडे. जी स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता वैगरे म्हणते. तुम्ही हा विषय हाती घ्यावा असं इथे ठरलं. ती महिला एवढी भारी निघाली की, ती या बाबालाच गुरु मानणाऱ्या आणखी एका महिलेकडे गेली. तिने सांगितलं की, असं-असं आहे.. हे सांगितल्यावर काय झालं की, गुरु मानणाऱ्या महिलेने हे सगळं खरातला सांगितलं. 

यानंतर खरात थेट सिन्नरच्या वावी पोलीस स्टेशनजवळ पोहचला आणि त्याने सगळ्या प्रकरणात ज्या दोघांकडे व्हिडिओ होते त्यांच्याविरोधात खंडणीची तक्रार नोंदवली. 5 कोटींच्या खंडणीची तक्रार त्याने दिली. त्याची पहिली एफआयआर ही आपल्या हाती आहे. 

  • गोष्ट क्रमांक 2- अशोक खरातकडे काम करणारा नीरज जाधव.. त्याचा ऑफिस बॉय.. याला सुद्धा या सगळ्या गोष्टी कळल्या होत्या. त्याला ते कसं कळलं हे सांगण्यासारखं पण नाही.. त्याने हे सगळं का केलं हे तर मी चारचौघात बोलूही शकत नाही. इतकं अश्लाघ्य आहे सगळं.. 

ठीकए.. त्याने या सगळ्यातून ठरवलं की, यातून बाबाला धडा शिकवायचा. आपल्या घरापर्यंत विषय आलाय कारण आता. ओके.. मग त्याने काय केलं. त्याच्याकडे पण हे सगळे व्हिडिओ आणि फोटो होते. पण हे करत असताना त्याने एक मोठी चूक केली. अशोक खरातकडे येऊन गेलेल्या एका महिलेचा फोटो आणि व्हिडिओ याच्याकडे होता. याने त्या महिलेला गाठलं.

हे ही वाचा>> बोटावरच्या भल्या मोठ्या ड्रेसिंगचे फोटो स्वत: रुपाली चाकणकरांनीच दाखवले मीडियाला, म्हणाल्या...

ते पाहून ती महिला घाबरली. मग ती म्हणाली की हे AI जनरेटेड आहे.. हे काही खरं नाही. हे दोघं एकदा भेटले पण. त्यावेळी महिलेचं असं म्हणणं आहे की, त्याने मला ते वन टाइम सिन असतात तो व्हिडिओ दाखवला आणि तो निघून गेला. 

पण या सगळ्यामुळे झालं काय की, नीरज जाधवने हे जे काही सगळं केलं त्यामुळे त्याच्याविरोधात देखील शिर्डीमध्ये दुसरी तक्रार दाखल झाली. त्याची सुद्धा एफआयआर कॉपी आपल्या हातात आहे. 

या दोन तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी काय केलं.. की, पोलिसांनी पहिलं जे खंडणीचं प्रकरण आहे.. जी तक्रार खरातने स्वत: वावी पोलीस स्टेशनला दिली होती. या प्रकरणातील दोन मित्रांना पोलिसांनी उचललं. त्यात पोलिसांना आणखी व्हिडिओ सापडले. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी उचललं नीरज जाधवला. त्यावेळी शिर्डी पोलिसांना दुसरे आणखी व्हिडिओ सापडले. 

त्यानंतर हे सगळं चक्र राजीनाम्यापर्यंत कसं पोहचलं.. याचीच आजची ही Inside Story. 

या दोन्ही गोष्टी ज्या सांगितल्या त्याच्या एफआयआर आपल्याकडे आहेत. त्या आपण पाहूया. ज्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. 

FIR क्रमांक घेण्याआधी मला आणखी एक सांगायचं आहे. आता मी हे सांगतोय हा पहिला भाग आहे या सगळ्याचा. दुसरा भाग पुन्हा सांगेन.. त्याचं कारण आहे की, SIT स्थापन झालेली आहे. त्यामध्ये 3 FIR चा उल्लेख आहे. त्यातील दोन आपल्याकडे आहेत. आणि एक जी मूळ FIR आहे.. जी नाशिक शहरमध्ये दाखल झाली आहे. ज्यामध्ये क्राइम ब्रांचने अशोक खरातला उचललं आणि त्यानंतर SIT कडे तपास गेला. ती जी FIR आहे. ते सगळं प्रकरण जाणून घ्यायचं असेल तर त्याआधी या संपूर्ण कहाणीचा हा भाग 1 तुम्ही पूर्ण जाणून घ्या.

हे ही वाचा>> 'अशोक खरातसोबत अनेक लोकांचे फोटो आहेत', रुपाली चाकणकरांचं मोठं विधान

याशिवाय खरातची लूक आऊट नोटीस आणि महिला आयोगाचं पत्रंही आपल्या हातात आहे. 

सुरुवात करूया FIR क्रमांक 1 पासून...

  • पहिली FIR: वावी पोलीस स्टेशन.. खंडणीची.. मी तुम्हाला दोन मित्रांचा उल्लेख केला होता. आता हळूहळू आपण पुढे जाऊन.. यामध्ये धमकी आणि खंडणी याची कलमं लावण्यात आली आहे. 

या FIR मध्ये दोन पात्रं आहेत. अशोक खरात स्वत: FIR लिहितो. त्यामध्ये तो असं लिहितो की, मी स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून FIR देतो. तो म्हणतो.. इसमनामे दिनेश परब.. राहणार मुंबई 2010 पासून मी त्याला ओळखतो. त्याचं मुंबईत हॉटेल व्यवसाय असून त्यातून आमची ओळख झाली. 

तो माझ्या प्रत्यक्ष आणि फोनद्वारे संपर्कात आहे. दिनेश परब हा असा व्यक्ती आहे की, जो वारंवार खरातकडे यायचा, त्याला भेटायचा आणि मुद्दा असा आहे की, मुंबईत एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये हे दोघं भेटले आणि त्यांच्या बिझनेसबाबत काही डील झाले. 

आता पहिली तारीख येते.. ती म्हणजे 22 डिसेंबर 2025.. खरात म्हणतो, 22 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 या 5 दिवसात माझ्या फोनवर दिनेश परबने मला व्हॉट्सअॅप नंबरवर काय पाठवलं.. तर त्यात वन टाइम सीन जे होतं असे काही फोटो पाठवले. त्याने मला सांगितलं की, या सगळ्यामध्ये राजेंद्र जासूद नावाचा व्यक्ती आहे. तर तुमचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो हे त्याने माझ्या मोबाइलवर पाठवले आहेत. असं त्याने फोनवर सांगितलं. व्ह्यू वन्स अशा स्वरूपातील 4 फोटो टाकले होते. खरात सांगतो परबने त्याला कॉल केला. परबने सांगितलं जासूद नावाची व्यक्ती आहे. त्या जासूदने त्याच्याकडील मोठे मला पाठवले ते तुम्ही एकदा बघून घ्या. 

मग हे फोटो खरातला आले. हे फोटो मी ओपन करून पाहिले. त्यात मी उभा असून.. हा रेफरन्स लक्षात ठेवा. आता जो व्हिडिओ व्हायरल होतोय.. त्या संदर्भातील हा रेफरन्स आहे. 

खरात यामध्ये म्हणतो.. फोटो ओपन करून पाहिले असता मी त्यात उभा असून माझ्या जवळच्या टबलाजेवळ एक स्त्री बसलेली आहे तिचे दोन्ही पाय माझ्या कंबरेजवळ असल्याचे दाखवण्यात आलेले आहे.. हे स्वत: खरात म्हणतोय FIR मध्ये.. 

तसेच 3 फोटोमध्ये सुद्धा माझ्याजवळ वेगवेगळ्या महिला नग्न असल्याचे दाखवण्यात आले आहे. खरात हे स्वत: FIR मध्ये लिहतोय की, माझे फोटो कोणाकडे आहेत तर वेगवेगळ्या महिलांसोबतचे आहेत. 

तो असं म्हणतो की, हे पाहिल्यानंतर व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉलद्वारे मी दिनेश परबसोबत बोललो. त्यात त्याने मला सांगितलं की, जासूद याच्याकडे अशा प्रकारचे आणखी काही फोटो आणि व्हिडिओ आहेत. ते फोटो व्हायरल झाल्यास समाजात आपली बदनामी होईल. त्यामुळे समोरच्या व्यक्तीशी बोलून आपल्याला हा विषय मिटवून टाकावा लागेल.

त्यावर खरातने परबला सांगितलं की, त्यावर आपल्याला काय करावं लागेल? तर परब असं म्हणाला की, 5 कोटीमध्ये आपला विषय सेटल करू. त्यावर खरात म्हणाला की, सदर महिलांशी माझा काही संबंध नाही. 

आता खरातचे ते फोटो आहे ते खरातला दिसलं. तरी तो म्हणतो माझा काही याच्याशी संबंध नाही, हे तुम्ही जे काही पाठवलं आहे ते सगळं खोटं आहे. त्यावर परब असं म्हणाला की, भाऊ आपली समाजाता इज्जत आहे. आपल्या इज्जतीपेक्षा पैसा मोठा नाही. त्यावर खरात परबला म्हणाला की, मी एकही रुपया देणार नाही. 

तेव्हा परब म्हणाला की, आपण पैसे न दिल्यास लोक आपल्या ते फोटो व्हायरल करतील. तेव्हा खरात म्हणाला, मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या कामात आहे.. डिसेंबर महिना.. ज्या मुलीच्या लग्न पत्रिकेत रुपाली चाकणकर काय.. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची नावं दिसतील. 

त्यावर परब म्हणाला की, मी नाशिकला येतो.. तुम्ही 5 कोटी तयार ठेवा आपण हा विषय संपवून टाकू.. 

खरात FIR मध्ये असं म्हणतो की, मी या प्रकरणी दिनेश परब आणि राजेंद्र जासूद यांच्याविरोधात फिर्याद देतो.

गोष्ट क्रमांक 1 तुम्हाला समजली.. 

  • आता FIR क्रमांक 2 - ती कोणाची तर नीरज जाधवची.. हा कोण आहे.. तर खरातचा ऑफिस बॉय. त्याच्यासोबत बाबाने इतकं काही विचित्र केलं की, त्यामुळे याने ठरवलं की, बाबाला मी दाखवतोच.. पण यात त्याने जी चूक केली त्यातून बऱ्याच गोष्टी पुढे गेल्या. 

त्याने काय केलं, 24 वर्षीय तरुणी आहे.. जी शिक्षण वैगरे घेते.. आणि नजीकच्या परिसरातीलच आहे. या तरुणीने शिर्डी पोलिसात तक्रार दिली. 

आपल्या FIR मध्ये ती तरुणी म्हणते की, सुमारे 3 वर्षांपूर्वी मी नाशिकमध्ये ओकस प्रापर्टीमध्ये व्हिजिटिंग म्हणून जात होते. तिथे नीरज जाधव ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. आता हे ओकस प्रॉपर्टीज कुठलं तर या अशोक खरातचं.. 

पुढे तरूणी म्हणते.. गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी मला नीरज जाधवने व्हॉट्सअॅपवर AI जनरेटेड फोटो पाठवला. तो असं म्हणाला की, हा फोटो तुझा आहे आणि मी तो व्हायरल करणार आहे. 

आता फिर्यादीचं... म्हणजे त्या तरूणीचं असं म्हणणं आहे की, AI जनरेटेड आहे. पण तो फोटो तिचा आणि या अशोक खरातचा आहे. नीरज जाधवने सांगितलं होतं त्याचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवला. मग ती असं म्हणते की, थोड्याच वेळात नीरजने ते मेसेज आणि फोटो डिलिट केले असं सांगितलं. पण मी खूप घाबरली होती. मी भीतीपोटी घरच्यांना या गोष्टी सांगितलेल्या नाही. 

मात्र 7 दिवसांपूर्वी एक अनोळखी व्यक्ती मला साईबाबा मंदिराजवळ भेटलीच. ती व्यक्ती मला म्हणाली की, नीरज जाधवकडे तुझे अश्लील फोटो आहेत. त्या आम्ही व्हायरल करणार आहोत. असं म्हणून तो गर्दीत निघून गेला. त्यावेळी मी त्याला नीट पाहू शकली नाही. पण माझी खात्री झाली की, नीरज जाधव ओकस प्रॉपर्टीमध्ये कामाला होता. त्यामुळे त्याने माझे फोटो मॉर्फ करून त्याने अश्लील फोटो तयार केले. त्यामुळे त्याने मला पाठवलेला फोटो मी प्रिंट सकट हजर करत आहे. त्यामुळे माझी नीरज जाधव याच्याविरोधात माझी तक्रार आहे.

आता याप्रकरणी पोलीस तपास करत आहे. 

दोन्ही FIR मधील गोष्टी संपल्या.. आता आपण सुरुवातीला ज्या दोन गोष्टी सांगितल्या होत्या त्याकडे आपण पुन्हा जाऊया. 

शिर्डी पोलीस नीरज जाधवच्या प्रकरणाचा तपास करत होते. नाशिक ग्रामीणचे पोलीस खंडणी प्रकरणाचा तपास करत होते. जी स्वत: अशोक खरातने दिली होती. यामध्ये एक कॉमन गोष्ट सापडली. यामध्ये एकच दुवा होता.. म्हणजे अशोक खरात. 

खंडणी प्रकरण कशाबाबत होतं तर लैंगिक शोषण आणि दुसरं नीरज जाधव संबंधी जरी प्रकरण असलं.. तरी नीरज जाधव हा अशोक खरातचाच ऑफिस बॉय होता. यामुळे या दोन्ही केसेसमध्ये एक माणूस समान होता तो म्हणजे अशोक खरात. फक्त केसमध्ये समान नाही दिसला.. तर खरात हा फोटो आणि व्हिडिओमध्ये देखील समान दिसला.

म्हणून अहिल्यानगरच्या आणि नाशिक ग्रामीणच्या पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामुळे सुरुवातीला खंडणीची तक्रार असलेल्यांकडून व्हिडिओ ताब्यात घेतले. तर दुसरीकडे नीरज जाधवकडूनही पोलिसांनी फोटो आणि व्हिडिओ ताब्यात घेतले. त्यानंतर हे समजलं की, या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे. 

यात DYSP हे हुशार होते. ते आयजींकडे गेले त्यांनी सांगितलं की, असं असं आहे.. आयजी आणखी हुशार निघाले. आयजी म्हणाले की वर ब्रिफिंग झालं पाहिजे. मग त्यांनी आणखी वर ब्रिफिंग केलं. मग त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय झाली तर.. SIT ची स्थापना. 

तुम्हाला वाटत असेल की, SIT आता स्थापन झाली वैगरे.. पण 13 मार्चला SIT स्थापन झाली होती. तोपर्यंत अशोक खरातला उचललं पण नव्हतं. 17 मार्चच्या रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी या दोन प्रकरणांमध्ये SIT स्थापन केली होती. कारण यातून व्हिडिओ रेकॉर्ड झाले होते. याआधी सिव्हील ड्रेसमधील अधिकारी खरातवर पाळत ठेवून होते. 

एवढंच नाही.. 14 मार्चला SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी दोन्ही पोलीस स्टेशनसोबत पत्र व्यवहार केला आणि त्याचे सगळे कागदपत्र आमच्याकडे वर्ग करा हे लेखी कळवलं. त्यानंतर हे प्रकरण पुढे गेलं. 

  • पुरावा क्रमांक 1- लूकआऊट नोटीस.. ही अशोक खरात विरोधात होती. कारण त्याला या प्रकरणाचा सुगावा लागला असता तो परदेशात पलायन करण्याची शक्यता होती. म्हणून ही लूकआऊट नोटीस काढण्यात आली होती. 

आता या सगळ्यात 3 व्यक्ती आहेत. म्हणजे खंडणी प्रकरणातील दोन आरोपी आणि नीरज जाधव. यातील एका व्यक्तीने श्रीरामपूरच्या पत्रकाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याने बातमी छापली.. त्यानंतर काय झालं, खुलासा वैगरे छापावा लागला. 

पण त्या पत्रकाराला हे माहितीच नव्हतं की, हे दोघे पुण्यातील महिलेला भेटले होते आणि तिथून ते सगळं आणखी एका महिलेकडे गेलं जी महिला या बाबाला गुरु मानत होती. 

पुढे असं झालं की, यामध्ये थेट महिला आयोगाची एंट्री झाली. महिला आयोगाने काय केलं. महिला आयोगाने त्याला नाही विचारलं की, तू हे का छापलं? महिला आयोगाने सुमोटो दाखल करून घेतली आणि त्यामध्ये जी बातमी छापली होती. ती कोणत्या आधारावर बातमी छापली याचीच विचारणा महिला आयोगाने केली. 

यावर पत्रकाराने जो खुलासा केला त्यात त्याने म्हटलं की, या बातमीत मी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्याने बातमीत काय वापरलं होतं की, कॅप्टन भोंदूबाबा.. त्यात अशोक खरात वैगरे असं काही वापरलं नव्हतं. 

पण अशोक खरातने हे स्वत:च म्हटलं की, हे माझ्यासंबंधीच बोललं आहे. त्यामुळे त्याने पत्रकाराला कायदेशीर नोटीस पाठवली. यामध्ये महिला आयोग उतरला. महिला आयोगाने खरं तर यामध्ये थेट उतरण्याची गरज होती की नव्हती हा वेगळा मुद्दा आहे. पण महिला आयोगाने पुढची चूक काय केली ते पाहा.. 

सुमोटो दाखल करत महिला आयोगाने जिल्हा अहिल्यानगरच्या पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिलं. त्यामध्ये लिहिलं की खबरदार पुढारी बातमी प्रसारित केली आणि त्याची महिला आयोगाने दखल घेतली. म्हणजे आयोगाने दखल ज्याच्यामुळे अडचण झाली त्याची घेतली पाहिजे होती. पण बातमी ज्याने छापली त्याचीच दखल घेतली. आयोगाने आपल्या पत्रात म्हटलं की, वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी जनमानसात भावना आहे.

या पत्राच्या आधारे वावी पोलीस ठाण्याने एक पत्र लिहिलं पत्रकाराला.. त्यात पोलिसांनी लिहिलं की, आपणास कळविण्यात येते की,  अशोक खरात यांच्या तक्रारीवरून तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तरी आपण आपला जबाब नोंदवणे. म्हणून 17 मार्च रोजी आपण वावी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणे. 

हे सगळं प्रकरण आता पोहचलं कुठपर्यंत.. तर ते पोहचलं रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यापर्यंत. 

आता आणखी एक गमंत सांगतो.. काल मी जासूदला फोन केला होता. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि त्याचं. मी त्याला सांगितलं पत्रकार बोलतोय वैगरे.. म्हटलं तुमच्याविरोधात खरातने खंडणीची केस दिली होती. ते म्हणाले साहेब मी जेवतोय.. मी म्हटलं दोन मिनिटं घेतो.. तो म्हणाला मी जेवतोय दोनच मिनिटात कॉल करतो तुम्हाला.. त्या क्षणापासून आतापर्यंत त्या माणसाचा फोन स्विच ऑफ आहे. असं सगळं घडतंय. 

दिवसेंदिवस या प्रकरणातील माणूस गायब होतोय. कोणी बोलायला तयार नाही.. एकतर घर सोडून निघून जातोय किंवा फोन बंद करतंय.. यामुळे शंकेला प्रचंड वाव आहे. राजीनामा झाला म्हणून प्रकरण संपलेलं नाही किंवा त्याचं गांभीर्य कमी झालेलं नाही.

    follow whatsapp