Baba Siddiqui Case Update : बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह आणि शिवकुमार उर्फ शिवा गौतम अशा तीन शुटर्सची नावे समोर आली होती. या तीन शुटर्सपैकी दोघांना पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली तर शिवा हा फरार झाला होता. या आरोपींमधील धर्मराज आणि शिवा हे दोघेही एकाच गावचे रहिवाशी होते. आणि हे दोघेही भंगारचा काम करायला जातोय, असे सांगून घराबाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. (baba siddiqui murder update accused dharmraj kashayp shiva gautam family reaction lawrence bishnoi gang)
ADVERTISEMENT
आरोपी धर्मराज कश्यप आणि शिवा गौतम हे कैसरगंज कोतवालीच्या गंडारा गावचा रहिवासी आहेत. हे दोघेही पुण्यात भंगार विकण्याचे काम करणार असल्याचे कुटुंबियांना सांगून घराबाहेर पडले होते. या दोन्ही आरोपींच्या कुटुंबियांशी आजतकने बातचित केली आहे. यामध्ये दोन्ही आरोपींच्या आईने मोठी माहिती दिली आहे.
हे ही वाचा : Baba Siddiqui : मिरचीचा स्प्रे मारून..., सिद्दीकींच्या हत्येचा 'हा' होता खरा प्लान?
आरोपी धर्मराजच्या आईने सांगितले की, तिचा मुलगा दोन महिन्यांपूर्वी पुण्याला भंगार विक्रेत्याच्या कामासाठी गेला होता, पण तो तिथे काय करतो हे तिला माहीत नव्हते. सकाळी पोलीस आल्यावर संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली. तो कधीच कॉल करत नाही मग तो काय करतो हे आपल्याला कसे कळेल. एकटा गेला नाही, दुसऱ्यासोबत गेला, असे तिने सांगितले आहे.
आरोपी शिवाच्या आईने सांगितले की, होळीनंतर आठ दिवसांनी शिवा गेला होता, मात्र फोनवर बोलणे झाले नव्हते. पण तिथे गेल्यावर चार दिवसांनी बोलणे झाले. त्याच्यासोबत गेलेल्या मुलाच्या फोनवरून आमचं बोलणे झाले. त्यावेळेस शिवा आईला म्हणाला, का त्रास देते आहेस. जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोलेन, असे शिवाच्या आईने सांगितले. तसेच या घटनेबाबत सकाळी रस्त्यावर एक मुलगा बोलत होता. तेव्हा तिला या घटनेची माहिती मिळाली आणि मी घाबरले असे शिवाची आई सांगते.
हे ही वाचा : Baba Siddique : सिद्दीकींच्या मारेकरांना हत्यार, वाहन कुणी पुरवली? कोर्टाच्या सुनावणीत काय झाला उलगडा?
दरम्यन या घटनेत बहराइचच्या कैसरगंजचे नाव समोर आल्यानंतर पोलीस आणि एसओजी सक्रिय झाले आहेत. दोघांच्याही कुटुंबीयांची त्यांच्या घरी चौकशी केली जात आहे. दोन्ही आरोपींचा गुन्हेगारी इतिहास तपासण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
