Baba Siddique : सिद्दीकींच्या मारेकरांना हत्यार, वाहन कुणी पुरवली? कोर्टाच्या सुनावणीत काय झाला उलगडा?
Baba Siddique Murder Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले होते.यावेळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने गुरमेल सिंहला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर दुसरा आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन असल्याने त्याचं वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गुरमेल सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
धर्मराज कश्यपचे वय शोधण्यासाठी बोन ओसीफिकेशन चाचणी
कोर्टात आणखी काय घडलं?
Baba Siddique Murder Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले होते.यावेळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने गुरमेल सिंहला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर दुसरा आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन असल्याने त्याचं वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात या प्रकरणात आरोपींना हत्यारं कुणी पुरवली? वाहन कुणी दिलं? आरोपी कुठे वास्तव्यास होते? या सगळ्या गोष्टींचा आता उलगडा होणार आहे. (baba siddiqui murder case what happen in court gurmail singh dharmraj kashyap lawrence bishnoi)
ADVERTISEMENT
अटकेत असलेल्या दोन संशयित आरोपींची आज सुटीकालीन न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. तसेच फिर्यादीचे वकील आणि बचाव पक्षाच्या वकीलांमध्ये काय युक्तीवाद झाला आहे? हे जाणून घेऊयात.
फिर्यादीचे वकील कोर्टात म्हणाले की, बाबा सिद्दीकी हे ज्येष्ठ राजकारणी होते आणि त्यांची हत्या करण्यात आली होती. आरोपी हरियाणा आणि यूपीचे रहिवासी आहेत. ते घटनास्थळाची रेकी करण्यासाठी येथे थांबले होते. तसेच आरोपींनी बंदूक कोठून खरेदी केली? आरोपींनी गोळीबाराचे प्रशिक्षण कुठे घेतलं?
हे ही वाचा : Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट, चौथ्या आरोपीची ओळख पटली; कोण आहे तो शूटर?
आरोपींकडून 28 जिवंत गोळ्या सापडल्या असून, केवळ या प्रकरणाचा तपास सुरू नाही, तर पुढील गुन्हे घडू नयेत याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे आरोपींना कोणी आर्थिक मदत केली? हा तपासाचा विषय आहे. या गुन्ह्यात राजकीय हस्तक्षेप असेल तर त्याचा शोध घ्यावा लागेल.त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी 14 दिवसांच्या कोठडीची फिर्यादीच्या वकिलांनी केली होती.
बचाव पक्षाचे वकील सिद्धार्थ अग्रवाल म्हणाले, 'नक्कीच ही घटना निराशाजनक आहे, परंतु आरोपींनी हे केले आहे की नाही हे ठरवावे लागेल. गोळी कोणी चालवली हे फिर्यादीकडून स्पष्ट झालेले नाही. मृत हा प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्व असून अन्य कोणीतरी हे कृत्य केले असण्याची शक्यता असून आरोपींना गोवण्यात येत आहे. 14 दिवसांची कोठडीची मागणी रास्त नाही.
हे वाचलं का?
यावर फिर्यादीचे वकील म्हणाले, 'या प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी आम्ही 10 टीम तयार केल्या असून अनेक आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्या हिंसेचा दुसरा कोणी बळी ठरला तर त्रास होईल. ही संपूर्ण घटना प्लान होती. आधी प्लान केला, नंतर रेकी केली आणि गुन्हा घडला.
हे ही वाचा : Baba Siddique : गावात एकाचा काटा काढला, 18 व्या वर्षी जेल..., सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरची क्रिमिनल हिस्ट्री
दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुरमेल सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अल्पवयीन असल्याचा दावा करणाऱ्या धर्मराज कश्यपचे खरे वय शोधण्यासाठी बोन ओसीफिकेशन चाचणी करण्याचे आदेश दिले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT