Baba Siddiqui : मिरचीचा स्प्रे मारून..., सिद्दीकींच्या हत्येचा 'हा' होता खरा प्लान?
Baba Siddiqui Murder Update : बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात प्रत्येक क्षणाला नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी वेगळाच प्लॅन रचण्यात आला होता. आणि घटनास्थळी कोणत्यातरी कारणास्तव गडबड झाली आणि मारेकऱ्यांनी सिद्दीकींना ठोकून पळ काढला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सिद्दीकींच्या हत्येचा वेगळाच होता प्लान
मग खरा प्लान काय होता?
सिद्दीकींच्या हत्या कशी करणार होते?
Baba Siddiqui Murder Update : बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात प्रत्येक क्षणाला नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी वेगळाच प्लॅन रचण्यात आला होता. आणि घटनास्थळी कोणत्यातरी कारणास्तव गडबड झाली आणि मारेकऱ्यांनी सिद्दीकींना ठोकून पळ काढला होता. त्यामुळे सिद्दीकींना मारण्याचा नेमका खरा प्लॅन काय होता? हे जाणून घेऊयात. (baba siddiqui murder update accuse wanted to putting chilli spray in his eyes and kill police sources lawrence bishnoi)
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची आरोपींनी पुर्ण प्लानिंग केली होती. सिद्दीकीच्या डोळ्यांवर मिरचीचा स्प्रे (Paper Spray)मारून हत्येचा कट रचला होता. मात्र घटनास्थळी आरोपींनी मिरचीचा स्प्रे मारताच आला नाही आणि त्यांनी थेट गोळीबार करून पळ काढला, अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळते आहे.
हे ही वाचा : Baba Siddique : सिद्दीकींच्या मारेकरांना हत्यार, वाहन कुणी पुरवली? कोर्टाच्या सुनावणीत काय झाला उलगडा?
पोलीस सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मिरचीचा स्प्रे सोबत आणला होता. आरोपी सिद्दीकींच्या डोळ्यावर स्पे मारून त्यांची हत्या करण्याचा प्लान होता. मात्र त्याआधीच शिवाने गोळीबार केला होता. कारण स्प्रे धर्मराज कश्यपकडे होता. जो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर 6 राऊंड गोळीबार केला होता. बाबा सिद्दीकी यांच्याशिवाय आणखी एका कामगाराच्या पायाला गोळी लागली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
खरंच 'वाय' दर्जाची सुरक्षा होती का?
बाबा सिद्दीकी यांना सरकारकडून 'वाय' दर्जाची सुरक्षा पूरवण्यात आल्याची आधी चर्चा होती. मात्र बाबा सिद्दीकी यांना वायप्लस सुरक्षा नव्हती, त्यांना नियमीत सुरक्षा होती. घटना घडली त्यावेळी त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी होते, अशी माहिती गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. तसेच गुन्हेशाखची 15 टीम या प्रकरणाच्या तपासासाठी बाहेर आहेत. लॉरेंन्स बिष्णोई गँगच्या सहभागाबाबत आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती नलावडे यांनी दिली.
हे ही वाचा : Baba Siddique : गावात एकाचा काटा काढला, 18 व्या वर्षी जेल..., सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरची क्रिमिनल हिस्ट्री
आरोपींकडून दोन पिस्तुल आणि 28 काडतुसं आम्ही जप्त केले आहेत. आम्हाला 21 ऑक्टोबर पर्यंत आरोपीची कोठडी मिळाली आहे. आम्ही या प्रकरणात लॉरेंन्स बिश्नोई गँगचा जो रोल आहे, त्याबाबतही चौकशी करत आहोत. लॉरेंन्स बिश्नोई किंवा सलमान खान या प्रकरणात आम्ही सर्व अँगलचा तपास करत आहोत. आमच्या टीमकडून सर्व अँगलमध्ये तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती नलावडे यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT