Suresh Dhas : "संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस यांचं खळबळजनक विधान! म्हणाले, "तिच्यासोबत झटापट केल्याचं..."

Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. या हत्या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा खळबळजनक प्रतिक्रिया दिलीय.

Suresh Dhas On Walmik Karad

Suresh Dhas On Walmik Karad

मुंबई तक

• 06:43 PM • 18 Feb 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्येचा नेमका काय प्लॅन होता?

point

सुरेश धस यांनी सांगितली महत्त्वाची माहिती

point

सुरेश धस माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हणाले?

Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. या हत्या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस म्हणाले, "प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून कळंब येथे न्यायचं. कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती. तिच्यासोबत झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलंय याचं समर्थन करायचं. अशाप्रकारचा प्लॅन होता. पण त्या गावाच्या अलीकडच संतोष देशमुखचा अंत झाला. त्यामुळे संतोष देशमुखच्या बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही".

हे वाचलं का?

सुरेश धस पुढे म्हणाले, "मोबाईल 10 तारखेच्या नंतर बंद करून ते गोदावरी नदीत फेकले आहेत की आणखी कुठे फेकलेत? त्याच्यामुळे काही गोष्टीत अडचणी येत आहेत. अशाप्रकारची आमची माहिती आहे. म्हणून मुख्यमंत्री आणि शुक्ला मॅडम यांच्याकडे आम्ही गेलो. महादेव मुंडे यांच्या खुन प्रकरणाला 15 ते 16 महिने जो विलंब लागला आहे. या विलंब लागण्याच्या कालावधीत बीड जिल्ह्याच्या एसपीपासून परळीच्या त्या पीआयपर्यंत जे जे कोणी जबाबदार आहेत. त्या सर्वांवर कारवाई व्हावी. कारण आता आशा निर्माण झालेली आहे की महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी सापडतील. रश्मी शुक्ला मॅडमला आणखी एक विनंती मी केलीय, करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तूल ठेवणारे जे सर्व लोक आहेत, त्यांची रश्मी शुक्ला यांच्या विश्वासातले जे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी. 

हे ही वाचा >> Sanjay Shirsat: "संजय राऊतांनी महाराष्ट्राची वाट लावली आणि...", संजय शिरसाटांची राऊतांवर घणाघाती टीका

फरारा आरोपी कृष्णा आंधळे सापडत का नाहीय? यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, तो संभाजी नगरला पोलिसाची तयारी करायला होता. त्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला. त्याने जे काही गुन्हे केलेले आहेत, त्या गुन्ह्यामध्ये तो यापूर्वी सुद्धा घरा दाराची फिकीर न करता, तो बेमुरतपणे बाहेर पळाला आहे. माझी सुद्धा स्वत:ची इच्छा आहे की तो लवकरात लवकर त्याठिकाणी सापडला पाहिजे. कारण तो तेव्हढाच एक कोकरू बाळ याच्यामध्ये शिल्लक आहे. आतापर्यंत नऊ आरोपी हे 302 मध्ये त्याठिकाणी गेलेले आहेत. 

हे ही वाचा >> Vijay Wadettiwar: "सगळे भ्रष्टाचारी, सरकार गेंड्याच्या कातडीचे...", हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष होताच वडेट्टीवारांचा हल्लाबोल

 

    follow whatsapp