BJP MLA Vijaykumar Deshmukh, Solapur : "आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करणाऱ्यांच्या कमरेत लाथ घाला, सर्व पक्षात फिरून चमचागिरी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये" असं म्हणत भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वत:च्या पक्षातील लोकांना सुनावलं आहे. विजयकुमार देशमुख यांनी चक्क सोलापुरातील एका तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.
ADVERTISEMENT
सोलापुरात भाजपमध्ये गटबाजी, अंतर्गत वाद समोर
शहराध्यक्षांचे वागणे चुकीच आहे. बाहेरील पक्षातून भाजपमध्ये येऊन कार्यकर्त्यांना दमदाटी करणाऱ्यांना कमरेत लाथ घाला. असं विजयकुमार देशमुख म्हणाले आहेत. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात उलटसुलट चर्चा रंगली आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीमध्ये मागील अनेक महिन्यांपासून आपापसात धुसफुस सुरू आहे. ऑगस्ट 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण गृह प्रकल्पाचे सोलापुरातील दहिटणे येथे उद्घाटन झाले होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्री यांच्या समोर पक्षातील गटबाजी बोलून दाखवली होती. आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांवर दादागिरी केली जात आहे आणि ती खपवून घेतली जाणार नाही, अशी कैफियत त्यांनी मांडली होती.
हेही वाचा : संतोष देशमुखांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचे बॅनर झळकवून पैसे मागणारा आहे तरी कोण?
तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला बीजेपी आमदाराची हजेरी
सोलापूर शहर पोलीसांनी सोलापूर आणि धाराशिवमधून श्रीशैल हुळ्ळे यास तडीपार केले आहे. अनिल हुळ्ळे या तडीपार गुंडाने सोलापूर शहरात एक कार्यक्रम आयोजित केला होता. या जनसंवाद बैठकीला भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी हजेरी लावली होती. समाजाची बैठक का घेतली? असं काही लोकं म्हणतात, जर असं कोणी दमदाटी करत असेल तर त्याच्या कमरेत लाथ घाला, त्यात कसलीही हयगय करू नका. कोणीतरी कुठल्या तरी पक्षातून इकडं आमच्याकडं चमचेगिरी करत यायचं. इथं येऊन दादागिरी करत असेल तर खपवून घेऊ नका, आपण सगळे वीरशैव लिंगायत आहोत, असे देशमुख यांनी म्हटले आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून आमदार विजयकुमार देशमुख हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपाचे सक्रिय आमदार म्हणून ओळख असलेले विजयकुमार देशमुख मागील वर्षाभरापासून पक्षाच्या विविध कार्यक्रमापासून अलिप्त राहत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यात देखील ते दिसून येत नाहीत.
हीच अवस्था शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदार सुभाष देशमुख यांची आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा अन्य मंत्र्यांच्या कार्यक्रमात हे दोन्ही आमदार दिसून येत नाहीत. सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात मात्र आमदार सचिनकल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांचा हिरीरीने सहभाग दिसून येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
भरधाव Ertiga कार डिव्हायडर तोडत समुद्रात कोसळली अन् थेट तळाला; मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात
ADVERTISEMENT
