भरधाव Ertiga कार डिव्हायडर तोडत समुद्रात कोसळली अन् थेट तळाला; मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात

मुंबई तक

Mumbai Coastal Road Car Accident : भरधाव Ertiga कार डिव्हायडर तोडत समुद्रात कोसळली अन् थेट तळाला; मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात

point

भरधाव Ertiga कार डिव्हायडर तोडत समुद्रात कोसळली

Mumbai Coastal Road Car Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर सोमवारी (दि.6) मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलीये. वरळीतून वेगाने जात असलेल्या Ertiga कारचं नियंत्रण सुटल्याने ती कार डिव्हायडर तोडत तब्बल 30 फूट खाली समुद्रात कोसळली. या भीषण अपघातात 28 वर्षीय चालक फ्राशोगोर दारायूश बत्तीवाला याचा जीव महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांच्या तत्परतेमुळे वाचला. पोलिसांच्या माहितीनुसार, बत्तीवाला हा चालक महालक्ष्मीकडून वरळीकडे कार घेऊन जात होता. अतिवेगामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती थेट डिव्हायडरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कार हवेत उडत समुद्रात कोसळली आणि काही क्षणांतच पाण्यात बुडाली.

चालकाने मद्यप्राशन केले होते का? पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, अपघातानंतर बत्तीवालाला जखमी झाला होता . त्याच वेळी गस्त घालत असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी मारत त्याला वाचवले. त्यानंतर त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.वरळी पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून चालकाचा जबाब नोंदवला आहे. तसेच घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. चालकाने मद्यप्राशन केले होते का? याचीही चौकशी सुरू आहे.

हेही वाचा : शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, मनोज जरांगेंची जोरदार टीका; नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांच्या तत्परतेमुळे वाचला चालकाचा जीव 

“कार फार वेगाने आली होती. नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडरवर आदळली आणि थेट खाली समुद्रात कोसळली. जवानांनी तत्परतेने कारवाई केली नसती, तर हा अपघात जीवघेणा ठरला असता,” असं घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. अपघातानंतर मंगळवारी सकाळपर्यंत कार अजूनही समुद्रात बुडालेली होती आणि तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. या घटनेनंतर नव्याने विकसित झालेल्या कोस्टल रोडवर वेगमर्यादा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. “अपघातानंतर आम्ही चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यशस्वी झालो.” असं वरळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp