शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, मनोज जरांगेंची जोरदार टीका; नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

Manoj Jarange Patil on Sharad Pawar : शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, मनोज जरांगेंची जोरदार टीका; नेमकं काय म्हणाले?

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं"

point

मनोज जरांगेंची जोरदार टीका; नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil on Sharad Pawar : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे यांनी प्रथमच शरद पवारांवर थेट टीकेचे बाण सोडले आहेत. 1994 साली शरद पवारांनी मराठ्यांच्या हक्काचं 16 टक्के आरक्षण ओबीसींना दिलं आणि त्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं, अशी टीका जरांगे यांनी केली. तसेच ज्या शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं, त्यांचे उपकार ओबीसी नेते विसरले, असंही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. 

मनोज जरांगे शरद पवारांवर टीका करताना काय म्हणाले? 

मनोज जरांगे म्हणाले, “1994 साली ओबीसींना दिलेलं आरक्षण हे खरं तर मराठ्यांच्या हक्काचं होतं. आमचं 16 टक्के आरक्षण आम्हाला परत मिळणार आहे. पण ज्यांनी हे आरक्षण ओबीसींना दिलं त्या शरद पवारांचे उपकार ओबीसी नेत्यांनी जपले नाहीत. उलट पवारांनी आमचंच वाटोळं केलं.”

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी यापूर्वी अनेक आंदोलनं केली असून, त्या आंदोलनांना शरद पवारांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी वारंवार केला होता. मात्र, त्यावेळी जरांगे यांनी पवारांवर टीका केली नव्हती. आता मात्र त्यांनीच पवारांनी मराठा समाजाचं नुकसान केल्याचा थेट आरोप केला आहे.

विजय वडेट्टीवार यांना मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर 

विजय वडेट्टीवार यांना प्रत्यु्त्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळच्या आहारी जाऊन तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या करियरचं वाटोळं करु नका. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करु नको. राज्यातील मराठा आणि कुणबी एकच आहे. छगन भुजबळ हा माणूस जातीवादी आहे. तुम्ही स्वत:ला संपवून घेऊ नका. मराठ्यांचे आणि ओबीसींचे भांडण लाऊ नका. तुमचा काँग्रेसचा मोर्चाही काढू नका. साठ-सत्तर जण सरकार आणि मराठ्यांचे विरोधात षडयंत्र रचत आहेत. आमच्या आरक्षणाला तुम्ही काही करु शकणार नाहीत. छगन भुजबळांचं ऐकून तुम्ही काँग्रेस संपवू नका. या राज्यातील मराठा कुणबी आहे, तुम्ही विरोध करु नका. मी स्वत:ला नेता मानत नाही. परळीतील लाभार्थी टोळीच्या नादी लागू नका. वडट्टीवार साहेब बिकट वेळ टाळायची असेल तर शहाणे व्हा. शेवटचा सांगतो उद्याचा मोर्चा ओबीसींचा नसेल काँग्रेसचा असेल. देवेंद्र फडणवीस योग्य वाटेवर चालले आहेत. आपण दहा वर्ष चुकीच्या वाटेवर चालले होते, हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलेलं आहे. ज्यांच्यासाठी सुपिक वाट केली, काटे काढले. तेच लोक फढणवीस साहेबांचा गेम करायला लागले आहेत. हे सगळे शब्द फडणवीसांच्या आसपासच्या लोकांचे आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp