Mumbai Mayor 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरुन शिंदे सेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. यासाठी दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु आहेत. ही रस्सीखेच सुरु असतानाच यामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. जर आरक्षण सोडतीत महापौर पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे (एसटी) आरक्षण निघाले तर शिवसेना UBT चा महापौर होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीकडे या प्रवर्गातील उमेदवारच नाही. यामुळे राजकीय विश्वात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीत खलबतं, भाजप अन् शिंदेसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची होणार बैठक, पाहा काय घडलं?
..तर शिवसेना UBT चा महापौर होणार
महानगरपालिकेत महापौरपदाची निवड करण्याआधी आरक्षण सोडत घेतली जाते. यावेळी ही सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये ज्या प्रवर्गासाठी आरक्षण येईल त्या प्रवर्गाचा महापौर निवडला जातो. जर जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाली तर महापौरपद अनुसूचित जमातीकडे जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शिवसेना UBT चा महापौर होणार हे निश्चित आहे. कारण ठाकरे गट वगळता कोणत्याही पक्षाकडे अनुसूचित जमातीचा नगरसेवक नाही. त्यांच्याकडे या प्रवर्गातील दोन नगरसेवक आहेत.
'या' नगरसेवकांना महापौर पदाची संधी
अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या दोन्ही वॉर्डातून शिवसेना UBT चे नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये वॉर्ड 53 मधून जितेंद्र वळवी आणि वॉर्ड 121 मधून प्रियदर्शिनी ठाकरे यांचा समावेश आहे. त्यामुळे जर अनुसूचीत जमातीसाठी आरक्षण जाहीर झाले तर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. दरम्यान, महायुतीकडे या प्रवर्गातून निवडून आलेला कोणताही उमेदवार नसल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
हे ही वाचा : BMC Mayor: एकनाथ शिंदेंचा महापौर बसू शकतो, भाजपसोबत ‘प्रेशर टॅक्टीस’मागे ‘या’ आहेत 10 शक्यता
मुंबई महापालिका निवडणूक निकाल; कोणी किती जागा जिंकल्या?
भारतीय जनता पार्टी – 89
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 65
शिवसेना (शिंदे गट) – 29
इंडियन नॅशनल काँग्रेस – 24
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन – 8
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 6
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – 3
समाजवादी पार्टी – 2
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) – 1
ADVERTISEMENT











