मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीत खलबतं, भाजप अन् शिंदेसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची होणार बैठक, पाहा काय घडलं?

मुंबई तक

Mumbai Mahapalika Mayour : निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत कोणत्याही एका पक्षाला न मिळाल्याने मुंबईच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिंदे सेनेत वाटाघाटी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता हा निर्णय दिल्ली दरबारात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दिल्लीतील या बैठकीत शिंदे सेनेकडून खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे सहभागी होणार आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Mahapalika Mayour
Mumbai Mahapalika Mayour
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीत खलबतं

point

भाजप अन् शिंदेसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची होणार बैठक, पाहा काय घडलं?

Mumbai Mahapalika Mayour, मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीने काठावरचं बहुमत मिळवलंय. मात्र, मुंबईकरांनी भाजपला एकहाती सत्ता दिलेली नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजपला त्यांचा महापौर करता येणार नाहीये. हीच संधी समजून शिंदेंच्या शिवसेनेने महापौर पदावर दावा केलाय. दरम्यान, मुंबईच्या महापौर पदासाठी आता थेट दिल्लीत खलबंत होणार असल्याची माहिती आहे. राज्यातील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची लवकरच दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत मुंबई महापालिकेतील महापौर पदासह विविध महत्त्वाच्या समित्यांच्या वाटपावर सविस्तर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

भाजप आणि शिंदेसेनेचे कोणते नेते उपस्थित राहणार? 

मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते. त्यामुळे येथील महापौर पदाला केवळ राजकीयच नव्हे, तर प्रशासकीय आणि आर्थिक दृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत कोणत्याही एका पक्षाला न मिळाल्याने मुंबईच्या महापौरपदासाठी भाजप आणि शिंदे सेनेत वाटाघाटी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता हा निर्णय दिल्ली दरबारात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दिल्लीतील या बैठकीत शिंदे सेनेकडून खासदार राहुल शेवाळे, खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे सहभागी होणार आहेत. तर भाजपकडून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम आणि मंत्री आमदार आशिष शेलार हे चर्चेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या नेत्यांमध्ये मुंबई महापालिकेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापौर पदाबरोबरच स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य समिती आणि शिक्षण समिती यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांच्या अध्यक्षपदांवर कोणाचा दावा राहणार, यावरही या बैठकीत खलबते होणार आहेत. 

भाजपने मुंबईत कमी जागा आल्याचं खापर शिंदे सेनेवर फोडलं? 

दरम्यान, भाजप आणि शिंदे सेनेत बीएमसी निवडणुकीच्या निकालावरून मतभेद असल्याचं समोर आलंय. भाजप नेत्यांकडून मुंबईत कमी जागा आल्याचं खापर शिंदे सेनेवर फोडल्याचं बोललं जातंय. जास्त जागा मागून कमी जागा निवडून आणल्यामुळे स्ट्राईक रेट कमी झाल्याचा ठपका भाजपने शिंदेसेनेवर ठेवलाय. मात्र मुस्लिम बहुल जागा मागितल्या नसतांना लढण्यास भाग पडल्याचा शिंदे सेनेकडून युक्तिवाद करण्यात आलाय. 

तसेच भाजपकडून मदत न झाल्यामुळे जवळपास 11 जागा कमी फरकाने पडल्याचही शिंदे सेनेच्या नेत्यांचं मत आहे.  यामध्ये वॉर्ड 121 अंधेरी पूर्व  मधील प्रतिमा खोपडे फक्त 14 मतांनी पराभूत झाल्या. वॉर्ड क्रमांक 32 मध्ये चारकोप येथील मनाली भंडारी 84 मतांनी पराभूत झाले. तर वॉर्ड 128 घाटकोपर पश्चिम अश्विनी हांडे 158 मतांनी पराभूत, तसेच प्रिया सरवणकर 197 मतांनी 191 या दादर मधून पराभूत झाले.  तसेच समाधान सरवणकर यांना  वॉर्ड क्रमांक 194 मधून 603 मतांनी पराभवाचा सामना करावा लागलाय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp