Chhagan Bhujbal: 'तुम्हाला उडवण्याची 50 लाखाची सुपारी', भुजबळांना दिलेल्या पत्राने मोठी खळबळ

मुंबई तक

10 Feb 2024 (अपडेटेड: 10 Feb 2024, 11:13 AM)

मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तुम्हाला 50 उडवण्याची लाखाची सुपारी दिल्याचा उल्लेख पत्रात असल्याने आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

chhagan bhujbal

chhagan bhujbal

follow google news

Chhagan Bhujbal : राज्यात सलग राजकीय नेत्यांवर गोळीबार केल्याच्या घटना ताज्या असतानाच मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्याने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ मोठ्या राजकीय पक्षातील नेत्यांवर उघडपणे गोळ्या झाडत जीव घेणाऱ्या घटना घडल्या आहेत. तर आता पत्र पाठवून मंत्र्यांनाच जीवे मारण्याचीच धमकी आल्याने राजकीय वर्तुळासह सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

कार्यालयात पत्र दिलं

राज्यात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यापासून जरांगे आणि भुजबळ वाद टोकाला गेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून टीका केली होत असतानाच आता थेट पत्र पाठवून छगन भुजबळांना धमकी देण्यात आल्याने आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मंत्री भुजबळांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली जात आहे. 

50 लाखाची सुपारी

ओबीसी आरक्षणासाठी उघडपणे सरकारविरोधात भूमिका घेणारे छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आले आहेत. तर आता थेट त्यांच्या नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून त्यांना 'तुम्हाला उडवण्याची 50 लाखाची सुपारी' अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

आपल्याला ठार मारले जाईल

नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती त्या पत्रातून देण्यात आली आहे. तसेच अज्ञात व्यक्तींकडून आपल्याला ठार मारले जाईल अशी एका पत्राद्वारे छगन भुजबळांच्या हितचिंतकाने माहिती दिली आहे. 
 

पोलीस सुरक्षेत वाढ

आपल्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्यामुळे व त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. याआधीही त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, त्यामुळे आता पुन्हा एकाद त्यांनी धमकी मिळाली असल्याने भुजबळांना धमक्यांचे सत्र सुरूच असल्याची चर्चा सुरु आहे. 

    follow whatsapp