Abhijeet Deepke Family : विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत पार पडलेल्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या आंदोलनात मुख्य भूमिका बजावणारे आंदोलक अभिजीत दीपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरी सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. अभिजीत यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांचे आई आणि वडील यांच्याशी विशेष संवाद साधण्यात आला, ज्यामध्ये त्यांनी या संपूर्ण आंदोलनादरम्यान आलेल्या भीषण प्रसंगांवर आणि आपल्या भावनांवर मोकळेपणाने प्रकाश टाकला.
ADVERTISEMENT
20 तारखेचा लाठीचार्ज आणि पालकांची भीती
आंदोलनादरम्यान 20 तारखेला झालेल्या लाठीचार्जची आठवण काढताना अभिजीत यांची आई अत्यंत भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, "शिक्षणमंत्र्यांनी आधीच राजीनामा दिला असता, तर 20 तारखेला विद्यार्थ्यांना असा अमानुष मार खावा लागला नसता. पोलिसांनी अत्यंत निर्दयीपणे लेकरांवर लाठीचार्ज केला. तो व्हिडिओ 21 तारखेला पाहिल्यानंतर मला रडू आवरत नव्हते. लहान मुलांसारख्या विद्यार्थ्यांना खिळे असलेल्या काठ्यांनी मारण्यात आले, ज्यामुळे माझा आणि माझ्या पतीचा बीपी खालावला व आम्हाला दोघांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले होते."
अभिजीत यांच्या वडिलांनीही आपल्या भीतीबद्दल सांगताना स्पष्ट केले की, "उपोषणाला बसलेल्या तरुणांकडे सुरुवातीला कोणीही लक्ष दिले नाही. त्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडण्यात आले होते. त्यामुळे, सोनम सरांना जसे उचलून नेण्यात आले, तसेच अभिजीतच्या जीवाचेही काही बरं-वाईट करतील किंवा एखाद्याला पैसे देऊन त्याच्यावर 'शूट आऊट' करतील की काय, अशी भयंकर भीती आम्हाला वाटत होती."
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट, वरुणराजा खवळणार
मुलाची जिद्द आणि पालकांचे आरोग्य
आंदोलनाच्या काळात पालकांनी अनुभवलेला मानसिक ताण आणि अभिजीतची जिद्द यावर भाष्य करताना आईने सांगितले, "आम्ही त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो दरवेळेस म्हणायचा की 'मम्मी, मी आता देशाचा आहे, मला जे करायचे आहे ते करू दे.' त्याने पोलिसांच्या पाया पडतानाचा आणि स्वतःची तब्येत बिघडलेली असतानाचा व्हिडिओ पाहून आमचा जीव टांगणीला लागला होता. सतत येणारे फोन आणि बातम्यांमुळे वाढणाऱ्या ताणामुळे आम्ही दोन महिन्यांच्या काळात आमचे फोन पूर्णपणे बंद ठेवले होते."
हे ही वाचा : नवरा कामासाठी परराज्यात, इकडे बायकोने 6 महिन्यांच्या मुलाला संपवलं, नेमकं कारण काय?
राजकीय पाठिंबा आणि बदललेले चित्र
आंदोलन यशस्वी होण्यापूर्वी आणि नंतर मिळालेल्या पाठिंब्याबद्दल बोलताना अभिजीत यांच्या वडिलांनी सांगितले की, सुरुवातीला सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनाकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्या पडत्या काळात अंबादास दानवे, बाळासाहेब आंबेडकर, दीपक केदार, संभाजी ब्रिगेड आणि दलित पँथर्स चळवळीतील कार्यकर्त्यांनीच त्यांना धीर दिला. मात्र, राजीनामा मंजूर झाल्यानंतर आणि आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता अनेक राजकीय नेते त्यांच्या घरी भेट देण्यासाठी येत आहेत.
हे ही वाचा : 'तो' एक क्षण अन्.. 'राज'पुत्राचं नेमकं चुकलं तरी काय? ट्रोलिंग आणि बरंच काही!
पुढील प्रवासाबद्दल पालकांची भूमिका
"मुलाने केलेल्या गोष्टीचा आता अभिमान वाटतो का?" या प्रश्नावर उत्तर देताना अभिजीत यांच्या आईने सांगितले की, "सुरुवातीला आम्हाला वाटले होते की हे आंदोलन तीन-चार दिवसांत संपेल. पण जेव्हा सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली, तेव्हापासून हे प्रकरण खूप मोठे झाले. आता अभिजीत खूप पुढे निघून गेला आहे. आम्ही जरी त्याला अशा फंदात पडू नको असे सांगितले, तरी तो ऐकणार नाही. त्याने ज्या उद्देशासाठी हे केले, त्यात त्याला यश आले आहे."
ADVERTISEMENT












