CJP Protest Delhi : दिल्लीतील जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसआयआर विरोधात कॉकरोच जनता पार्टी आंदोलनाची घोषणा केली आहे. यासाठी सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र या आंदोलनाआधी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून 57 मेट्रो स्टेशन्स आज (10 ऑक्टोबर) सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच, 75 मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून, मुंबईहून दिल्लीकडे येणाऱ्या महत्त्वाच्या राजधानी व दुरंतो एक्सप्रेस गाड्यांवरही याचा थेट प्रभाव पडला आहे.
ADVERTISEMENT
सीसीटीव्ही कॅमेरे, जमावबंदी
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नवी दिल्ली जिल्ह्याचे 20 भागांत विभाजन करण्यात आले असून, प्रत्येक विभागाची जबाबदारी आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. संवेदनशील परिसरांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी 300 हून अधिक ऑडिओ-व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय, सुरक्षेचा उपाय म्हणून संसद मार्ग पोलीस स्टेशन परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएस) कलम 163 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली असून, पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा : Personal Finance: Mutual Fund कंपनी बंद पडली तर तुमचे SIP मध्ये गुंतवलेले पैसे बुडतात का?
ऑनलाईन क्लासेस, परीक्षा रद्द
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी राजधानीतील अनेक प्रमुख मार्गांवरील रस्ते डायव्हर्ट करण्यात आले असून ठिकठिकाणी कडक बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. संभाव्य गोंधळ किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील अनेक शाळांनी प्रत्यक्ष वर्गांऐवजी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले असून पूर्वनियोजित परीक्षा रद्द केल्या आहेत.
हे ही वाचा : सगळ्यात मोठी बातमी, 'राष्ट्रपतींनी वोट चोरीचा आरोप फेटाळला नाही, पुरावे...' द्रोपदी मुर्मूच्या भेटीनंतर राहुल गांधींचा दावा
आंदोलनाला परवानगी का नाकारली?
सीजेपीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली यासाठी एक निवेदन जारी केले होते. त्यात दिल्ली पोलिसांनी होते, "CJP चा अर्ज 7 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाला होता, तर कार्यक्रम 10 ऑक्टोबर रोजी नियोजित आहे. याचा अर्थ अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत पाळली गेली नाही." यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये नियमांचे कथित उल्लंघन झाल्याचे कारणही पोलिसांनी या निर्णयामागे दिले.
ADVERTISEMENT











