Ajit Pawar: "आरोप सिद्ध झाला आणि सुई तिथपर्यंत...", सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत अजितदादा नेमकं काय म्हणाले?

DCM Ajit Pawar Press Conference : धस-मुंडे भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:07 PM • 16 Feb 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीबाबत अजित पवारांचं मोठं विधान!

point

"त्यात शासन होईल, कुणालाही सोडले जाणार नाही..."

point

उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले?

DCM Ajit Pawar Press Conference : भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात अनेक पाळेमुळे खणून काढली. देशमुखांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी याप्रकरणाचा मोठा पाठपुरावा केला. तसच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. परंतु, सुरेश धस यांनी नुकतच धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. धस-मुंडे भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 

हे वाचलं का?

अजित पवार धस-मुंडे भेटीबाबत पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

"याबाबत आम्ही पण ऐकतो.त्या दोघांनाच माहिती आहे. भेटल्यावर 3 दिवसांनी बातमी आली. सूत्रांच्या हावल्याने बातम्या देऊ नका.कुठलीही तक्रार करण्याचे जनतेने ठेवले नाही.केंद्राकडून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले, 50 वर्षासाठी दिले आहे.मुंडे आणि धस यांच्या बातम्या दाखवल्या. काय दाखवावे हा तुमचा अधिकार आहे. आम्ही काय करतो, विकासाचा प्रयत्न असतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की बीडची घटना काळिमा फासणारी आहे. त्यात शासन होईल कुणालाही सोडले जाणार नाही.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "एखादी बँक जर महिलांच्या हाती असेल, तर...", चंद्रपूरमध्ये CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

न्यायालयीन चौकशी, एसआयटी नेमली आहे, दोषी आहे त्यावर कारवाई होईल हे कितीदा सांगितले. आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीत सुई तिथपर्यंत पोहचली तर कारवाई करणार ना..अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा माझ्या बुद्धीला पटलं नाही म्हणून राजीनामा दिला, स्वच्छ काम केलं आहे, आजपर्यंत काम करत असतांना ओव्हर रुल करत नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Dhananjay Deshmukh: "उद्या गावकऱ्यांच्या मिटिंगमध्ये..." संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय देशमुख काय म्हणाले?

आमच्या बद्दल वेगळ्या बातम्या पसरवल्या जातात. विपर्यास केला जातो. वास्तविक तसं काही नाही. मागे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालवत होतो, त्यात देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. तसं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी आणि एकनाथ शिंदे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. बाकीचे मंत्री म्हणून काम करतायत, असंही अजित पवार म्हणाले.

    follow whatsapp