सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत गोपनीयता, वकिलांनाही भेटीची परवानगी नाकारली

मुंबई तक

18 Jul 2026 (अपडेटेड: 18 Jul 2026, 12:34 PM)

दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावरून आंदोलक सोनम वांगचूक यांना पोलिसांनी थेट सफदरजंग रुग्णालयात नेले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

Sonam Wangchuk

Sonam Wangchuk

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत कमालीची गोपनीयता

point

वकिलांनाही भेटीची परवानगी नाकारली

Sonam Wangchuk : दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावरून आंदोलक सोनम वांगचूक यांना पोलिसांनी उचलून नेले असून, त्यांना थेट सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले आहे. वांगचूक यांच्यावर पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने सध्या तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?

वैद्यकीय अहवाल उघड करण्यास नकार

सफदरजंग रुग्णालयातून आता एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक माहिती समोर येत आहे. रुग्णालय प्रशासन आणि दिल्ली पोलीस सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत कोणताही वैद्यकीय अहवाल (मेडिकल रिपोर्ट) उघड करण्यास स्पष्ट नकार देत आहेत. तिथे नेमकी काय परिस्थिती आहे, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने संभ्रम वाढला आहे. दरम्यान, सफदरजंग रुग्णालयाने सोनम यांच्या प्रकृतीबाबत एक आरोग्य बुलेटिन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, दीर्घकाळच्या उपवासामुळे आणि निर्जलीकरणामुळे सोनम वांगचुक अशक्त झाले आहेत, मात्र त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

हे ही वाचा : दूधात भेसळ ते अस्वच्छता, तुकाराम मुंढेंनी मुंबईत 5 हॉटेल्सचा बाजार उठवला..

वकील, डॉक्टरांना मज्जाव

या कारवाईदरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वांगचूक यांना ज्या खोलीत ठेवण्यात आले आहे, तिथे कोणालाही मोबाईल फोन घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सोनम वांगचूक यांच्या वकिलांना आणि वैयक्तिक डॉक्टरांनाही त्यांच्याशी भेटू दिले जात नसल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वांगचूक यांच्या समर्थकांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : बांगड्या भरल्या, लिपस्टिक लावली अन् मेकअप.., छेड काढणाऱ्या 'रोमिओ'ला तरुणीने शिकवला धडा VIDEO

वांगचूक यांच्या कुटुंबियांचा व्हिडिओ समोर

रुग्णालयाच्या आवारातून या संपूर्ण प्रकाराचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये वांगचूक यांचे कुटुंबीय प्रशासनाला जाब विचारताना दिसत आहेत. "आम्हाला आत फोन घेऊन जाण्यापासून का रोखले जात आहे? आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती का लपवली जात आहे?" असा संतप्त सवाल कुटुंबियांकडून उपस्थित केला जात असून, यावरून रुग्णालयाच्या आवारात सध्या संतप्त वातावरण पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा : दूधात भेसळ ते अस्वच्छता, तुकाराम मुंढेंनी मुंबईत 5 हॉटेल्सचा बाजार उठवला..

दिपकेंचं बेमुदत उपोषण

दरम्यान, सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलण्यात आल्यानंतर उपोषणाची धुरा अभिजित दिपके यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. याविषयी त्यांनी एक्स पोस्ट करुन माहिती दिली. 'मी आत्तापासूनच बेमुदत उपोषण सुरू करत आहे' अशी माहिती दिपके यांनी एक्सवरुन दिली.