रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'विलासरावांच्या...'

Devendra fadanvis : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण लातूरमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत अपशब्द काढले. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra fadnavis

Devendra fadnavis

मुंबई तक

06 Jan 2026 (अपडेटेड: 06 Jan 2026, 08:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

point

नेमकं काय म्हणाले होते रवींद्र चव्हाण?

Devendra Fadanvis statement over Vilasrao Deshmukh : भाजप नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याने राज्यात आता रान पेटल्याचं बघायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण लातूरमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी उपस्थितांना संबोधित करत सांगितलं की, "कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही." असं ते म्हणाले होते. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत कोण आहे सर्वात श्रीमंत उमेदवार? यादीच आली समोर

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, रवींद्र चव्हाण हे स्पष्टपणे म्हणाले होते की, मी फक्त रेकॉर्डवरून बोलत होतो. बाकी विलासराव देशमुख यांच्याबाबत सर्वांनाच आदर आहे. विलासराव यांच्या स्मृती कोणीही दुखवू शकत नाही आणि कोणीही पुसू शकणार नाही. आम्हाला सर्वांना त्यांचा आदर आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

'मी विलासरावांविरोधात टीका टीप्पणी केलेली नाही..'

दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. रवींद्र चव्हाण हे 6 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात प्रचाराला गेले होते, तेव्हा त्यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, 'मी विलासरावांविरोधात टीका टीप्पणी केलेली नाही. विलासराव देशमुखांच्या नावेच काँग्रेस आजही मते मागत आहेत. तसेच आम्ही मोदींच्या नेतृत्वात केलेलं काम आणि महायुतीने विकासात्मक दृष्टीने केलेल्या कामासाठी मत मागत आहोत. पण तरीही, माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,' असं ते म्हणाले.

हे ही वाचा : समोसेवाल्या काकांनी 10 वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार, क्रूरतेची सीमा गाठत... न्यायालयाने दिली 20 वर्षांची शिक्षा

नेमकं काय म्हणाले होते रवींद्र चव्हाण?

लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा लातूर जिल्हा यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याच मेळाव्यातील उपस्थितांचा उत्साह पाहून रवींद्र चव्हाण म्हणाले की, "खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय की, विलासराव देशमुखांच्या आठवणी लातरमधून 100 टक्के पुसल्या जातील. यात काही शंका नाही", असं त्यांनी वक्तव्य केलं.

    follow whatsapp