Eknath Shinde : महापालिका निवडणूक नुकतीच पार पडली, या महापालिका निवडणुकीनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौरपदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात महापौरपदासाठी रस्सीखेच सुरु होती. त्यानंतर कालपासून केडीएमसीचं स्थानिक पातळीवरील राजकारण बदललं बघायला मिळत आहे. मनसेनं शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. विकासाच्या मुद्यासाठी महायुतीला पाठिंबा दिल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं. मनसेनं महायुतीसोबत पाठिंब्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी राज ठाकरे यांच्या लवचिक राजकारणावर देखील भाष्य केलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : एकाच कुटुंबातील 4 जण जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात, भाजप नेत्याची घराणेशाही
केडीएमसीमध्ये मनसेची युती एकनाथ शिंदे काय म्हणाले?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी राज ठाकरे यांच्या मनसेच्या नगरसेवकांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, तसेच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. मनसेच्या या भूमिकेनं ठाकरेंच्या शिवसेनेला आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. याच युतीाबाबत एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता, त्यांनी उत्तर दिलं.
हे ही वाचा : मूल होत नसल्याच्या रागातून नवऱ्याने बायकोला संपवलं, हृदयविकाराचं कारण सांगत नातेवाईकांना...
विकासाच्या मुद्द्यावरच मनसेचा आम्हाला पाठिंबा
'कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेनेची युती आहे. आम्ही युतीत निवडणुका लढलो आहे. मनसेनं विकासाच्या मुद्द्यावरच आम्हाला पाठिंबा दिला, आम्ही त्यांचं स्वागत करतो. मनसेच्या वॉर्डमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या लवचिक राजकारणावरून काय म्हणाले एकनाथ शिंदे?
त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या लवचिक राजकारणाबाबत देखील त्यांनी वक्तव्य केलं. राज ठाकरे हे कधीही स्वार्थासाठी निर्णय घेत नाहीत. लोकसभेला देखील त्यांनी महायुतीला पाठिंबा देत अचुक भूमिका घेतली होती. राज ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.
ADVERTISEMENT











