Delhi Election Result: 'लढा अजून आपआपल्यात...', कोणी साधला काँग्रेस-आपवर निशाणा?

दिल्ली विधानसभेत काँग्रेस आणि आपने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली. यावरून ओमर अब्दुला यांनी त्यांना जोरदार टोमणा मारला आहे.

काँग्रेस-आपवर कोणी साधला निशाणा?

काँग्रेस-आपवर कोणी साधला निशाणा?

मुंबई तक

• 12:16 PM • 08 Feb 2025

follow google news

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (8 फेब्रुवारी) जाहीर करण्यात येत आहे. सध्या मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल भाजपच्या बाजूने येत आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे तर 'आप'ला फक्त 25 जागांवर आघाडी मिळाली आहे. मतमोजणी सुरू असताना, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून काँग्रेस आणि आपवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर 'महाभारत' या मालिकेतील एक दृश्य शेअर करताना ओमर अब्दुल्ला यांनी फक्त एवढेच लिहिले, 'लढू अजून आपआपसात!' हे स्पष्ट आहे की ते दिल्लीत काँग्रेस आणि 'आप'ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा संदर्भ देत आहेत.

हे ही वाचा>> Delhi Election 2025: भाजपने कमाल केली, राजधानीत कमळ फुलणार.. पाहा विधानसभा निवडणुकीचा निकाल

विधानसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीची किमया नाही

काँग्रेस आणि आप हे केंद्रातील इंडिया ब्लॉकचा भाग आहेत पण विधानसभा निवडणुकीत ही युती काम करत नाही. प्रथम हरियाणा आणि नंतर दिल्लीत काँग्रेस आणि आप यांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवली आणि दोन्ही ठिकाणी भाजपला फायदा झाला.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis: "दिल्लीत प्रचंड मोठा पराभव...", राहुल गांधींवर निशाणा साधत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

एक्झिट पोल खरे ठरले

दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. निकालांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये असे सांगण्यात आले होते की, यावेळी दिल्लीत भाजपची सत्ता येईल, म्हणजेच एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असे सांगण्यात आले होते. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, एक्झिट पोल बरोबर असल्याचे दिसून येत आहे.

    follow whatsapp