सोमय्यांच्या हाती 20 जणांची साक्ष; ‘जवाब दो’ म्हणत परबांना पुन्हा डिवचलं

मुंबई तक

• 08:56 AM • 31 Mar 2023

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट प्रकरण लावून धरलं आहे. यात सोमय्यांनी परब यांच्यावर आरोप केले आहेत.

Anil Parab and Kirit Somaiya face each other over the Dapoli research case

Anil Parab and Kirit Somaiya face each other over the Dapoli research case

follow google news

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दापोली तालुक्यातील मुरूड येथील साई रिसॉर्ट प्रकरण (Dapoli research case) लावून धरलं आहे. यात सोमय्यांनी परब यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणी सध्या अनिल परब (Anil Parab) यांना न्यायालयीन संरक्षण मिळालं आहे. पण याप्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू आहे. अशातच आता पुन्हा एकदा सोमय्यांनी परबांना या प्रकरणावरुन डिवचलं आहे. (Anil Parab and Kirit Somaiya face each other over the Dapoli research case)

हे वाचलं का?

काय म्हणाले किरीट सोमय्या?

एक पत्रक काढून सोमय्या म्हणाले, अनिल परब यांनी दापोली येथे समुद्र किनाऱ्यावर सीआरझेड, ना विकास क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन) मध्ये बांधलेला साई रिसॉर्ट हा अनधिकृत आहे. स्वतःच्या आमदारकीचा, मंत्रिपदाचा दुरुपयोग करून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून भ्रष्ट पद्धतीने सीआरझेड नो डेव्हलपमेंट झोन मध्ये बांधला आहे असे स्टेटमेंट 20 साक्षीदारांनी केले. ज्यात अनिल परब यांचे मित्र, भागीदार, सरकारी अधिकारी…. सहभागी आहेत.

ईडीने तसंच, आयकर खात्याने अनिल परब यांचा हा रिसॉर्ट जप्त केला आहे. आयकर विभागाने ही संपत्ती बेनामी घोषित केली आहे, तर ईडीने पर्यावरण नियमांचा भंग करून काळा पैशांनी भ्रष्ट व फसवणूक, फ्रॉड, फोर्जरी करून बांधलेला आहे म्हणून हा रिसॉर्ट जप्त केला आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : ओहरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक, 7 लोक जखमी

ईडीने या संबंधात 20 सरकारी अधिकारी, अनिल परब यांचे मित्र, चार्टर्ड अकाऊंटंट, भागीदार इ. ची साक्ष घेतली आहे. यातील सत्य म्हणजेच,

“अनिल परब यांची काळी कमाई व काळा रिसॉर्ट”.

जबाब:

1. विभास साठे – अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून ही जागा / जमीन विकत घेतली. विभास साठे यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये स्पष्टपणे म्हंटले आहे की, “एकूण 1 कोटी 80 लाख रुपयांपैकी 1 कोटी रुपये चेकने व 80 लाख रुपये अनिल परब यांनी रोख दिले होते. विभास साठे यांनी ईडीला दिलेल्या स्टेटमेंट मध्ये स्पष्टता केली आहे की, या रिसॉर्टसाठी अकृषिक परवाना त्यांच्या नावाने, त्यांच्या सहीने घेण्यात आला ही सही फोर्जरी आहे, खोटी, बनावटी आहे.

हेही वाचा : मालवणीत संभाजीनगरची पुनरावृत्ती टळली! शोभायात्रेदरम्यान काय घडलं?

2. श्री. जयराम देशपांडे, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी – देशपांडे यांनी ईडीला दिलेल्या स्टेटमेंट मध्ये ही स्पष्टता केली आहे की, हा रिसॉर्ट नो डेव्हलपमेंट झोन मध्ये असल्याची त्यांना माहिती होती परंतु, अनिल परब यांनी आणलेल्या दबावामुळे त्यांनी गैरकायदेशिररित्या हा परवाना दिला.

3. सुधीर शांताराम पारदुले, मंडल अधिकारी (सरकारी अधिकारी) – पारदुले यांनी स्पष्टता केली आहे की, नगररचना (Town Planning) विभागाने १२ ऑक्टोबर 2017 रोजी स्पष्टपणे कळविले होते की, दापोली – मुरुड गावातील गट क्र. 446 ही जागा सीआरझेड 3, नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहे, म्हणून येथे परवाना देता येत नाही. परंतु, अनिल परब यांच्या दबावामुळे यासाठी फोर्जरी करून परवानगी देण्यात आली.

4. अनिल परब – अनिल परब यांनी ईडीला दिलेल्या वक्तव्यात स्पष्टपणे मान्य केलं आहे की, ही जमीन त्यांनी 12 मे 2017 रोजी विभास साठे यांच्याकडून विकत घेतली व 29 डिसेंबर 2020 रोजी त्यांचे मित्र, भागीदार सदानंद कदम यांना विकली. अकृषिक परवानगी 4 बेडरूमच्या बंगलोची होती पण तिथे 14 बेडरूमचा रिसॉर्ट बांधला. हा रिसॉर्ट बांधण्यासाठी 5 ते 6 कोटी रुपये बांधकाम खर्च झाला हे ही परब यांनी ईडीला दिलेल्या वक्तव्यात म्हंटले आहे.

हेही वाचा : राम नवमीदिवशी दुर्दैवी घटना, 35 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू; नेमकं काय झालं होतं?

5. सदानंद गंगाराम कदम – अनिल परब यांचे मित्र भागीदार सदानंद कदम यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये स्पष्टपणे म्हंटले आहे की, ही जागा नो डेव्हलपमेंट झोन, सीआरझेड 3 मध्ये होती/आहे याची जाणीव अनिल परब व सदानंद कदम यांना होती. हा रिसॉर्ट अनिल परब यांच्या नावाने त्यांच्यासाठी बांधण्यात आला, हा रिसॉर्ट अनिल परब यांनी जमीन व त्या जमिनीवरील बांधकाम म्हणजे साई रिसॉर्ट एन एक्स सदानंद कदम यांना 30 डिसेंबर 2020 रोजी विकले.

याचप्रकारे, विश्राम परब (अनिल पराबांचे CA), विनोद देपोलकर (दलाल / ब्रोकर), संजय कुलकर्णी (साई रिसॉर्ट चे आर्किटेक), सुरेश तुपे (तत्कालीन सरपंच), अनंत कोळी (तत्कालीन ग्रामसेवक ), किशोर आग्रहकर ( नगर नियोजन अधिकारी), केतन जतानिया (सदानंद कदमांचे CA) व साई रिसॉर्ट बांधण्यात वापरण्यात आलेल्या कच्च्या मालाचे अनेक विक्रेत्यांचे (वेंडर्स) जबाब नोंदवण्यात आला आहे.

ईडी यांनी आपल्या इन्वेस्टीगेशन रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे म्हंटले आहे की, अनिल परब यांनी सीआरझेड, नो डेव्हलपमेंट झोनची ही जागा असताना व ते माहित असताना फोर्जरी करून, चीटिंग आणि फ्रॉड करून काळा पैशांनी हा रिसॉर्ट बांधला. हे बांधकाम करताना अनिल परब यांनी आपल्या पदाचा / प्रभावाचा दुरुपयोग ही केला. “अनिल परब जवाब दो”, असं म्हणतं किरीट सोमैया यांनी अनिल परब यांना आव्हान दिलं आहे.

    follow whatsapp