राहुल गांधींनी ‘Gen Z’ साठी केलेलं K-Pop स्टाइल आहे तरी काय? Friendship Day निमित्त खास शुभेच्छा!

मुंबई तक

02 Aug 2026 (अपडेटेड: 02 Aug 2026, 09:54 PM)

Rahul Gandhi Instagram: फ्रेंडशिप डे निमित्त राहुल गांधी यांनी K-Pop स्टाइल Finger Heart जेस्चर करत ‘Gen Z’ शैलीत शुभेच्छा दिल्या. ‘मी अजूनही विद्यार्थी आहे, दररोज काहीतरी नवीन शिकत आहे,’ असे म्हणत त्यांनी तरुणांशी संवाद वाढवण्याच्या आपल्या प्रयत्नांचा पुन्हा उल्लेख केला.

friendship day 2026 congress leader rahul gandhi gen z avatar extends wishes with a k pop style finger heart gesture

राहुल गांधी (फोटो सौजन्यः Instagram)

Google CTA

Rahul Gandhi Friendship Day 2026: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर वेगळ्याच अंदाजात शुभेच्छा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी K-Pop शैलीतील लोकप्रिय ‘Finger Heart’ जेस्चर करत स्वतःचा ‘Gen Z’ अवतार सादर केला आणि तरुणांकडून दररोज काहीतरी नवीन शिकत असल्याचे सांगितले.

हे वाचलं का?

राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले की,

“मी अजूनही विद्यार्थी आहे. दररोज काहीतरी नवीन शिकत आहे. आजचा धडा म्हणजे आज फ्रेंडशिप डे आहे आणि हा एक ‘हार्ट’ आहे. सर्वांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा. भरपूर प्रेम.”

 

‘Gen Z’ शी संवाद वाढवण्यावर राहुल गांधींचा भर

गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी सातत्याने तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडिया, अनौपचारिक चर्चा आणि विविध मोहिमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांपर्यंत पोहोचण्यावर विशेष भर दिला आहे.

विशेषतः विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी पेपर लीक, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था आणि लोकशाही यांसारख्या विषयांवर अनेकदा भूमिका मांडली आहे. त्यांच्या भाषणांमध्ये आणि सोशल मीडिया पोस्टमध्येही ‘Gen Z’ या पिढीचा उल्लेख वारंवार दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांना आवाज उठवण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता, भरती प्रक्रिया आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. याशिवाय त्यांनी तरुणांना आयुष्यातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याचा सल्लाही दिला आहे.

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी जीवन सरळ नसते, त्यामुळे परिस्थितीनुसार स्वतःला मजबूत आणि लवचिक बनवण्याचा संदेश दिला होता. त्याच संवादाचा पुढचा भाग म्हणून त्यांनी फ्रेंडशिप डेच्या दिवशी ‘Finger Heart’ जेस्चरचा वापर केला.

काय आहे K-Pop स्टाइल ‘Finger Heart’?

‘Finger Heart’ हा दक्षिण कोरियामधून लोकप्रिय झालेली एक छोटी खूण आहे. अंगठा आणि तर्जनी (Index Finger) एकमेकांवर क्रॉस करून छोट्या हृदयाचा आकार तयार केला जातो.

K-Pop संगीत आणि K-ड्रामाच्या लोकप्रियतेमुळे हा जेस्चर जगभर प्रसिद्ध झाला आहे. प्रेम, मैत्री, कृतज्ञता किंवा आपुलकी व्यक्त करण्यासाठी या चिन्हाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. विशेषतः Instagram, WhatsApp आणि X सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणांमध्ये हा ट्रेंड अत्यंत लोकप्रिय मानला जातो.