Harshwardhan Sapkal on Ashok Chavan, मुंबई : भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कंबर कसलीये. मराठवाड्यातील अनेक महापालिका जिंकण्यासाठी भाजपची वरीष्ठ मंडळी प्रचार सभा घेत आहेत. शिवाय यावेळी भाजप नेत्यांकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नांदेडमध्ये जात प्रचार सभा घेतली. यावेळी फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण स्टेजवर उपस्थित असताना काँग्रेसच्या काळात नांदेडचा विकास झाला नाही, असं वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापलेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केलीये.
ADVERTISEMENT
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अशोक चव्हाणांच्या मनात जरा तरी लाज राहिलीय का की तीही देवेंद्र फडणवीस चरणी गहाण ठेवलीय? देवेंद्र फडणवीस यांनी आज 70 वर्षात काँग्रेसच्या काळात नांदेडचा विकास झाला नाही, नांदेडच्या राज्यकर्त्यांकडे नियोजन नव्हते, असे वक्तव्य केले. यावेळी तिथेच बसलेल्या अशोकरावांना हा स्वतःचा अपमान वाटला नाही का? स्वतःचा जाऊद्या पण आपल्या वडिलांबद्दल कोणी बोललं तर कोणताही मुलगा हे कसं ऐकून घेईल? असा सवाल सपकाळ यांनी केलाय.
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अशोकरावांना हा स्व. शंकरराव चव्हाण साहेबांचा अपमान वाटला नाही का? की आपण एवढी लाचारी पत्करलीय की वडीलांचा अपमानही तुम्हाला क्षुल्लक वाटतोय. आम्ही गर्वाने सांगू शकतो, स्व. शंकरराव चव्हाण साहेब कॉंग्रेसचे नेते होते आणि त्यांनी स्वातंत्र्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या विकासाला गती दिली आणि नांदेड जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











