Harshwardhan Sapkal on BJP, सोलापूर : भाजपने बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच संतापलेत. भाजपला आता बलात्कार जनता पार्टी म्हणायचं का? असा सवाल सपकाळ यांनी केलाय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ सोलापुरात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजप व महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT
स्मार्ट सिटी आता दुर्बिणीतूनही दिसत नाही, हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपला टोला
“महापालिका निवडणुकीदरम्यान तीन खून होतात, हे भय निर्माण करण्याचे राजकारण नाही तर काय.?” असा सवाल करत त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवले. "पाच वर्षांपूर्वी जी आश्वासने दिली होती, तीच पुन्हा सांगितली जात आहेत. स्मार्ट सिटी आता दुर्बिणीतूनही दिसत नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला. “सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात दुहेरी पाईपलाईनद्वारे पाणी आणले. शिंदे कुटुंबाचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे,” असे सांगत त्यांनी प्रणिती शिंदे काँग्रेसमध्येच आहेत आणि राहतील असा ठाम विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा : अहिल्यानगर : कंदुरीच्या कार्यक्रमात मित्रांमध्ये वाद, बोकड कापण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या
“निवडणुकीच्या तोंडावर दीड हजार रुपये का दिले जातात? हे आचारसंहितेत बसते का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकार आर्थिक दिवाळखोरीत असल्याचा आरोप केला. “2100 रुपये देऊ म्हणाले होते, त्याचं काय झालं?” असा सवालही सपकाळ यांनी केला.
प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर सपकाळ यांची प्रतिक्रिया
“राजीव सातव हे काँग्रेसचे नेतृत्व होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना आम्ही दोन वेळा आमदार केले,” असे सांगत, पुढील वेळी भाजप त्यांना तिकीट देईल, असा दावा सपकाळ यांनी केला. ज्यांना मेवा पाहिजे ते पक्ष सोडून जात आहेत. राजकारणात निष्ठावंतांची भिंत लहान होत चालली आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











