Pimpri Chinchwad Crime : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. याच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. प्रचार सुरु असताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडलेल्या दिसून येत आहे. अशातच पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक पदाच्या महिला उमेदवाराच्या घरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची 33 वर्षीय डॉ. महिलेनं फिर्याद नोंदवली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशीतील लोकांनी आपल्या वाणीवर संयम ठेवावा, तर काही लोकांचे पैसे होणार खर्च
उमेदवारांच्या घरात भाजपच्या कार्यकर्त्या शिरल्याचा आरोप
प्रभाग क्र. 21 मधील विरोधी उमेदवारांच्या घरात भाजपच्या कार्यकर्त्या शिरल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी काही व्हिडिओ समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. यात काही भाजपचे कार्यकर्ते देखील घटनास्थळी उपस्थित होते. आमच्याविरोधात उभं राहण्याची हिंमत कशी केली? अशी धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. आरोपी हे विरोधी पॅनल भाजपच्या उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचं समर्थक आणि कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला. ही घटना 11 जानेवारी रोजी रात्री 12:15 वाजेच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : पुण्यात कोयता गँगची दहशत आहे म्हणता, मग तुम्ही गृहमंत्री अपयशी आहेत म्हणणार का? अजित पवारांचं उत्तर ऐकाच
अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा उमेदवार महिलेचा आरोप
दरम्यान, कोणतीही परवानगी न घेता प्रवेश करणाऱ्यांची नावे आता समोर आली आहेत, स्वप्नील, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरून जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे आणि स्वप्नील वाघेरे अशी नावे आहेत. तक्रारदार महिलेनं सांगितलं की, तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. तसेच दिराला धक्काबुक्की केली. आजीसह सासूला ढकलून दिले. दुचाकीसह वाहनांची नुकसान केली. आरडाओरड करून अश्लील शिवीगाळ करून दहशत निर्माण केल्याचं फिर्यादीत नमूद केलं.
ADVERTISEMENT











