मला धमकावणारे तुम्ही कोण? मी घाबरणारा असतो तर गावाकडेच राहिलो असतो, अन्नामलाई यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

K. Annamalai reply Raj Thackeray : "मला धमकावणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत ? मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. मला शिवीगाळ करण्यासाठीच त्यांनी सभा आयोजित केल्या आहेत. मी इतका महत्त्वाचा झालो आहे का, हेही मला कळत नाही. काही जणांनी तर मी मुंबईत आलो तर माझे पाय कापू, असे लिहिले आहे. मी मुंबईत येणारच आहे"

annamalai on raj thackeray

annamalai on raj thackeray

मुंबई तक

12 Jan 2026 (अपडेटेड: 12 Jan 2026, 02:11 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भXX तुझा इथे येण्याचा संबंध काय?

point

रसमलाई म्हणत राज ठाकरेंचा हल्लाबोल, आता अन्नामलाई यांचे प्रत्युत्तर

K. Annamalai reply Raj Thackeray, Mumbai : काही दिवसांपूर्वी तामिळनाडूतील भाजप नेते अन्नामलाई यांनी मुंबई शहराबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे", असं अन्नामलाई म्हणाले होते. दरम्यान, त्यानंतर ठाकरे बंधूंची मुंबईतील शिवतीर्थावर सभा पार पडली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अन्नमलाई यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. "भXX तुझा इथे येण्याचा संबंध काय? रसमलाई म्हणत राज ठाकरेंनी अन्नामलाई यांच्यावर हल्लाबोल केला होता. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता अन्नामलाई यांनी प्रत्युत्तर दिलंय.

हे वाचलं का?

हेही वाचा : Govt Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 10 वी पास उमेदवार देखील करू शकतात अर्ज... कधीपर्यंत कराल अप्लाय?

अन्नामलाई राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना काय म्हणाले? 

अन्नामलाई म्हणाले, मला धमकावणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत ? मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. मला शिवीगाळ करण्यासाठीच त्यांनी सभा आयोजित केल्या आहेत. मी इतका महत्त्वाचा झालो आहे का, हेही मला कळत नाही. काही जणांनी तर मी मुंबईत आलो तर माझे पाय कापू, असे लिहिले आहे. मी मुंबईत येणारच आहे; कुणाची हिम्मत असेल तर पाय कापून दाखवावेत. अशा धमक्यांना घाबरणार असतो, तर मी केव्हाच माझ्या गावातच राहिलो असतो, असं आव्हानही अन्नामलाई राज ठाकरेंना दिलं. 

“जर मी कामराज हे भारतातील महान नेत्यांपैकी एक आहेत, असे म्हटले, तर ते तमिळ नाहीत असा त्याचा अर्थ होतो का? आणि जर मी मुंबई ही जागतिक दर्जाची शहर आहे, असे म्हटले, तर ती महाराष्ट्रीय लोकांनी उभारलेली नाही, असा त्याचा अर्थ होतो का?” असा सवाल अण्णामलाई यांनी उपस्थित केला.

“माझा अपमान करणे काही नवीन नाही. डीएमके गेल्या अनेक वर्षांपासून हे करत आहे. मात्र आता ते तमिळ लोकांचा एक समाज म्हणून अपमान करत आहेत. त्यांचं राजकारण अशा धमक्या आणि दहशतीवरच टिकून आहे. हात-पाय कापण्याच्या धमक्यांनी घाबरणारा मी नाही,” असेही भाजप नेते अण्णामलाई म्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

‘मुंबईत 60 टक्के परप्रांतीय तर मराठी मतदार…’, रामदास आठवलेंनी महायुतीच्या विजयाचं गणित मांडलं

    follow whatsapp