Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 साली शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पायऊतार झालं आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकामागून एक मोठे धक्के बसलेले पाहायला मिळाले. पक्षातील 10 आमदार आणि बोटावर मोजण्याइतके बडे नेते सोडले तर सर्वांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलं. त्यामुळे ठाकरे अगदीच कमकुवत झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी काही अंशी यश मिळवलं, मात्र एकूण आकडेवारी पाहाता महाआघाडी सत्तेत येण्यात अपयशीच ठरली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाला. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे का? अशी चर्चा देखील सुरु झाली. ठाकरेंची युती होण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड संपेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले होते की, ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय, पण तो संपणार नाही, हे मी लिहून द्यायला तयार"...त्यामुळे ठाकरे ब्रँडबद्दल महाराष्ट्रातील लोकांना काय वाटतं? हे जाणून घेणे महत्त्वाचे असणार आहे. C-Voter ने घेतलेल्या सर्व्हेत लोकं काय म्हणाले? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
ठाकरे आजही महाराष्ट्रातील मोठा राजकीय ब्रँड? C-Voter च्या सर्व्हेत नेमकं काय?
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ हे नाव अजूनही प्रभावी आहे का, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या C-Voter च्या सर्व्हेमध्ये नागरिकांची थेट मते समोर आली आहेत. “ठाकरे अजूनही महाराष्ट्रातील मोठा राजकीय ब्रँड आहे का?” या प्रश्नावर सर्व्हेतील निष्कर्ष लक्षवेधी ठरले आहेत.
या सर्व्हेनुसार एकूण 43.7 टक्के मतदारांनी ‘होय, ठाकरे अजूनही एक प्रभावी राजकीय ब्रँड आहेत’ असे मत व्यक्त केले आहे. मात्र, 28.7 टक्के मतदारांच्या मते ठाकरे ब्रँड कमकुवत झाला आहे, तर 11 टक्के लोकांनी ‘आता ठाकरे ब्रँड राहिलेला नाही’ असे स्पष्ट मत नोंदवले आहे. 16.6 टक्के मतदारांनी याबाबत निश्चित मत व्यक्त केलेले नाही.
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : सर्वात मोठा ब्रॅण्ड कोणता? | C Voter | BMC Election Survey
हेही वाचा : काळीज पिळवटणारा व्हिडीओ, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचा मृत्यू, आईसह 8 तासांच्या लेकीने घेतले अंत्यदर्शन; महाराष्ट्र हळहळला
तरुण आणि मध्यमवयीन मतदारांचा कल
वयोगट निहाय आकडे पाहिले तर 18 ते 24 वयोगटातील 44.2 टक्के तरुण ठाकरे ब्रँड अजूनही मजबूत असल्याचे मानतात. 25 ते 34 वयोगटात हे प्रमाण 48.5 टक्के इतके असून, हा गट सर्वाधिक सकारात्मक दिसतो. दुसरीकडे, 45 ते 54 वयोगटात केवळ 37.3 टक्के मतदारांनी ठाकरे प्रभावी ब्रँड असल्याचे मत नोंदवले आहे, तर या गटात संभ्रमात असणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे.
अनुसूचित जाती/दलित घटकातील 47.4 टक्के लोक ठाकरे ब्रँड अजूनही प्रभावी असल्याचे मानतात. उच्चवर्णीय हिंदू गटात हे प्रमाण 46.1 टक्के, तर ओबीसी गटात 41.2 टक्के आहे. मुस्लिम समाजात 39.7 टक्के मतदारांनी ठाकरे अजूनही मोठा ब्रँड असल्याचे सांगितले असून, येथेही मतांमध्ये विभागणी स्पष्ट दिसते. भाषेनिहाय आकडे विशेष लक्ष वेधतात. मराठी भाषिकांमध्ये तब्बल 49.2 टक्के मतदार ठाकरे अजूनही मोठा राजकीय ब्रँड असल्याचे मानतात. हिंदी भाषिकांमध्ये मात्र फक्त 24 टक्के लोकांनी असे मत व्यक्त केले आहे, तर इतर भाषिक गटांमध्ये संभ्रम अधिक दिसतो.
ठाकरे हे नाव अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे संपलेले नाही, हे या सर्व्हेतून स्पष्ट होते. मात्र, त्याचवेळी ब्रँड कमकुवत झाल्याची भावना आणि संभ्रमही मोठ्या प्रमाणात दिसतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











