उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की राज ठाकरे? बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? C Voter च्या सर्व्हेत कोणाला पसंती?

Uddhav Thackeray Eknath Shinde or Raj Thackeray Who is Balasaheb Thackeray's true successor : C Voter ने घेतलेल्या उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की राज ठाकरे? यापैकी बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार कोण आहे? याबाबत लोकांनी मत व्यक्त केली आहेत. लोकांनी कोणाला किती टक्के पसंती दिलीये? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..

Uddhav Thackeray Eknath Shinde or Raj Thackeray Who is Balasaheb Thackeray's true successor :

Uddhav Thackeray Eknath Shinde or Raj Thackeray Who is Balasaheb Thackeray's true successor :

मुंबई तक

11 Jan 2026 (अपडेटेड: 11 Jan 2026, 12:10 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की राज ठाकरे? बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण?

point

C Voter च्या सर्व्हेत कोणाला पसंती?

Uddhav Thackeray Eknath Shinde or Raj Thackeray Who is Balasaheb Thackeray's true successor : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं. भगवी शाल, हाती रुद्राक्षाची माळ असा त्यांचा लूक आणि आक्रमक भाषण शैलीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशात आपला प्रभाव निर्माण केला. शिवाय त्यांना देशातील लोकांकडून 'हिंदू ह्रदयसम्राट' देखील म्हटलं गेलं. मात्र, आता त्यांचं निधन होऊन 14 वर्षे उलटली आहेत. 2012 साली बाळासाहेब ठाकरेंचं निधन झाल्यानंतर त्यांचा खरा वारसदार कोण? याबाबत अनेक चर्चा झाल्या. आजही त्या चर्चा थांबलेल्या नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 साली शिवसेनेत बंड केल्यानंतर याबाबत आणखी चर्चा सुरु झाली. दरम्यान, C Voter ने घेतलेल्या उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की राज ठाकरे? यापैकी बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार कोण आहे? याबाबत लोकांनी मत व्यक्त केली आहेत. लोकांनी कोणाला किती टक्के पसंती दिलीये? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

‘ठाकरे ब्रँड’चा खरा वारसदार कोण? या प्रश्नावर करण्यात आलेल्या ताज्या सर्व्हेमधून महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. सर्व्हेनुसार, एकूण मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांनाच ठाकरे ब्रँडचा योग्य वारसदार मानणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सर्व्हेच्या एकूण आकडेवारीनुसार 41 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे, 27.6 टक्क्यांनी एकनाथ शिंदे, तर 10.4 टक्के लोकांनी राज ठाकरे यांना ठाकरे ब्रँडचा खरा वारसदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. याशिवाय, 8.8 टक्के लोकांनी ‘कोणीच नाही’, तर 5.8 टक्क्यांनी ‘ठाकरे ब्रँड संपला आहे’ असे मत नोंदवले आहे.

हेही वाचा : मुंबई विमानतळावर येताच लंडनच्या डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं, FIR मध्ये नेमकं काय?

तरुणांमध्ये शिंदेंना आघाडी, मध्यमवयीनांमध्ये उद्धव ठाकरेंचे वर्चस्व

18 ते 24 वयोगटात एकनाथ शिंदे यांना 35.4 टक्के समर्थन मिळाले असून या गटात उद्धव ठाकरे 28.8 टक्क्यांवर आहेत. मात्र, 25 ते 34, 35 ते 44, 45 ते 54 आणि 55 वर्षांवरील सर्व वयोगटांत उद्धव ठाकरे स्पष्ट आघाडीवर असल्याचे सर्व्हे सांगतो. 55 वर्षांवरील गटात तर उद्धव ठाकरे यांना 50.3 टक्के लोकांनी ठाकरे ब्रँडचा वारसदार मानले आहे.

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : युतीमुळे मुंबई जिंकता येईल? | BMC Election | C Voter Poll

एनडीए, महाविकास आघाडी आणि मराठी भाषिक कोणाला मानतात बाळासाहेबांचा वारस?

अनुसूचित जाती-दलित गटात 47.7 टक्के, उच्चवर्णीय हिंदूंमध्ये 43.4 टक्के, तर मुस्लिम मतदारांमध्ये 37.1 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. ओबीसी गटात मात्र उद्धव ठाकरे (36.2 टक्के) आणि एकनाथ शिंदे (33.7 टक्के) यांच्यात तुल्यबळ लढत असल्याचे चित्र आहे. एनडीए समर्थक मतदारांमध्ये 39.2 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना ठाकरे ब्रँडचा वारसदार मानले आहे. तर विरोधी पक्षांच्या (महाविकास आघाडी) मतदारांमध्ये 57.7 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे ठाकरे ब्रँडचा मुद्दा राजकीय ध्रुवीकरणाशी थेट जोडला गेल्याचे स्पष्ट होते.

मराठी भाषिकांमध्ये 44.3 टक्के लोक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. मात्र, हिंदी भाषिकांमध्ये 40.2 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांना पसंती दिली आहे. या सर्व्हेनुसार, ठाकरे नावाशी जोडलेली राजकीय वारसा आणि भावनिक नाळ अजूनही मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे यांच्याशी जोडलेली आहे. मात्र, काही वयोगट, ओबीसी समाज आणि एनडीए समर्थकांमध्ये एकनाथ शिंदे यांची मजबूत पकड असल्याचेही या सर्व्हेने स्पष्ट केले आहे. ठाकरे ब्रँडचा वारसदार कोण, हा प्रश्न अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणार, हे निश्चित.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मंत्री नितेश राणेंच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळली, CCTV मध्ये तरुण दिसला; चिठ्ठीही ठेवली

 

 

 

 

 

 

 

 

    follow whatsapp