मंत्री नितेश राणेंच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळली, CCTV मध्ये तरुण दिसला; चिठ्ठीही ठेवली
Nitesh Rane bungalow An unattended bag was found outside : सुवर्णगड बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, एक तरुण ही बॅग त्या ठिकाणी ठेवून जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. संबंधित तरुणाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, तो नेमका कोण आहे आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मंत्री नितेश राणेंच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळली
CCTV मध्ये तरुण दिसला; चिठ्ठीही ठेवली
Nitesh Rane bungalow An unattended bag was found outside : मंत्री नितेश राणे यांच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग आढळल्याने सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट झाली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे नितेश राणे यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
सुवर्णगड बंगल्याच्या बाहेरील परिसरात ही बेवारस बॅग दिसून आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. बॅग संशयास्पद असल्याने संपूर्ण परिसराची नाकाबंदी करत नागरिकांची ये-जा काही काळासाठी थांबवण्यात आली. पोलिसांकडून बॅगची तपासणी सुरू असतानाच त्यावर एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत “या बॅगमध्ये बूट आणि कपडे आहेत. ते तुम्ही मोफत घेऊ शकता,” असा संदेश लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या बॅगेत काय आहे? याची तपासणी पोलिसांनी सुरु केली आहे. धोका टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण तपास प्रक्रिया काटेकोरपणे राबवली.
हेही वाचा : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या सभेआधी उद्धव ठाकरेंची मुंबई Tak वर Super Exclusive महामुलाखत
दरम्यान, सुवर्णगड बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, एक तरुण ही बॅग त्या ठिकाणी ठेवून जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. संबंधित तरुणाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, तो नेमका कोण आहे आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमागे केवळ खोडसाळपणा आहे की काही वेगळा हेतू, याची चौकशी सुरू आहे.










