Himanshi Narwal on Kashmiri Muslims : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले करनालचे रहिवासी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीचा फोटो पाहून देश हळहळला होता. त्यांचा तो फोटो घेऊन अनेकांनी स्टोरी आणि पोस्ट शेअर केल्या होत्या. त्याच हिमांशी यांच्या वक्तव्याची सध्या चर्चा होतेय. पहलगाममधील घटनेनंतर लोक मुस्लिम आणि काश्मिरींविरुद्ध ज्या पद्धतीने बोललं जातंय, ते घडू नये अशी भूमिका हिमांशी यांनी मांडली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> बाहेरच्या मुस्लिमांना मशिदीत नो एन्ट्री... पुण्यातील ग्रामपंचतींचा ठराव काय? 'पहलगाम'नंतर तणाव
हिमांशी म्हणाल्या, "आम्हाला फक्त शांती आणि शांती हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे. ज्यांनी चूक केली, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मी संपूर्ण देशाला आवाहन करू इच्छिते की विनय नरवाल कुठेही असो, तो निरोगी राहावा यासाठी प्रार्थना करा." त्या पुढे बोलताना असंही म्हणाल्या की, मी कुणाचाही द्वेष करत नाही.
विनय नरवालच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरादरम्यान पत्नी हिमांशीने या भावना मांडल्या. हिमांशीने तिच्या कुटुंबासह शिबिरात रक्तदान केले. हिमांशी म्हणाल्या, ही आमच्यासाठी विनयला खरी श्रद्धांजली आहे. यावेळी बोलत असताना कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
"काश्मिरींविरोधात चुकीची वक्तव्य करू नका"
हिमांशी नरवाल म्हणाल्या की, आमच्यासोबत घडलेल्या घटनेप्रमाणे हे इतर कोणासोबतही घडू नये. आम्हाला फक्त शांती हवी आहे. ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारलं त्यांना शिक्षा झाली पाहिजे. विशेष म्हणजे, हिमांशीने मुस्लिम आणि काश्मिरींविरुद्ध द्वेषपूर्ण वक्तव्यांवर आक्षेप घेतला आहे. हे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >> अमेरिका भारताच्या समर्थनात, नेव्हीसाठी 13 कोटींच्या 'या' सुरक्षा उपकरणांना मंजुरी, नौदलाची ताकद किती वाढणार?
करनालमध्ये आयोजित या रक्तदान शिबिरात फक्त करनालमधूनच नाही, तर शहराबाहेरील लोकही उपस्थित राहिले होते. वडील राजेश नरवाल म्हणाले, मी संघटनांशी बोललो होतो. विनयच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धांजली म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्याची विनंती केली होती. त्या संघटनांनी ही विनंती मान्य केली आणि आज मोठ्या संख्येने लोक रक्तदान करण्यासाठी पोहोचले होते. तरुणांनी अशा रक्तदान शिबिरांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे आणि रक्तदान करावे, ही विनय नरवालला खरी श्रद्धांजली असेल. आज माझ्या कुटुंबातील सदस्यच नाही तर माझे नातेवाईकही रक्तदान करत आहोत असं विनय यांचे वडील म्हणाले.
हिमांशी भावनिक झाली
रक्तदान शिबिरादरम्यान स्टेजवर बसलेल्या हिमांशी अनेक वेळा भावनिक झाल्या. आमदार जगमोहन आनंद आणि करनालच्या महापौर रेणू बाला गुप्ता देखील स्टेजवर तिच्यासोबत उपस्थित होत्या. हिमांशीने महापौरांना तिच्या हातावरची मेहंदीही दाखवली. त्यावर विनय नरवालचं नाव लिहिलेलं होतं. कार्यक्रमादरम्यान विनयची आई आशा नरवालही भावनिक झाल्या होत्या. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे डोळेही पाणावले.
ADVERTISEMENT
