मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात, 'हिंदी आमची लाडकी...'

मुंबई तक

31 May 2025 (अपडेटेड: 31 May 2025, 09:30 PM)

Pratap Sarnaik Hindi controversy : शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषा आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यावरुन आता महापालिकेच्या निवडणुकीआधी वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेवरुन आधीच वाद आहेत आणि अशातच प्रताप सरनाईकांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होतोय.

Pratap Sarnaik Hindi controversy

Pratap Sarnaik Hindi controversy

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषा आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य केलं

point

प्रताप सरनाईकांनी केलेल्या वक्तव्याने मराठी भाषिकांमध्ये नाराजीचा सूर

Pratap Sarnaik Hindi controversy : शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईकांनी मुंबई आणि हिंदी भाषेबाबत वक्तव्य केलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये हिंदी भाषेवरुन हमरातुमरी पाहायला मिळते. अशातच प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्याने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच रान पेटलं आहे. सरनाईक यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मराठी भाषिक नाराज झाले आहेत. यामुळे आता वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

हे वाचलं का?

हेही वाचा : टेन्शन वाढलं! 24 तासात 7 जणांचा मृत्यू, 2700 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात एका दिवसातच...

प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान हिंदी भाषेबाबत वक्तव्य केलं. ते म्हणाले की, हिंदी ही आमच्या मुंबईची भाषा आहे. आमची लाडकी भाषा आहे. सरनाईकांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची अप्रत्यक्षरित्या सुरूवात करण्यात आलीये की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

हिंदी आपली लाडकी बहीण!

ते म्हणाले की, आपण मराठी भाषेला मातृभाषा बोलतो, तशीच हिंदीही एक भाषाच आहे. हिंदी बोलताना त्यात इंग्रजी शब्द येतातच, त्यामुळे हिंदी आता मुंबईची भाषा बनली आहे. ठाणे आणि मीरा भाईंदर हे माझे मतदारसंघ आहेत. जनतेशी बोलताना मराठीतच बोलतो. त्यानंतर ते पुढे म्हणाले की, मीरा भाईंदरला जातो तेव्हा माझ्या तोंडून अपोआप हिंदी भाषा येते. मराठी आपली मातृभाषा असली तरीही हिंदी आपली लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य प्रताप सरनाईकांनी केलं आहे. 

प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल

प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना केली होती. ज्यामुळे मराठी माणसाला स्वाभिमानाने पुढे जाता येईल. आता हे लोक म्हणतात की, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत.

हेही वाचा : 'चंगळ्या आणि त्याची आई...' केस दाखल करणारी तरुणी नेमकी काय म्हणाली?

त्यानंतर राऊत पुढे म्हणाले की, त्यांच्या नेत्यांना विचारा की, त्यांना भूमिका आहे का? मराठी भाषेबाबत आपली मुख्य भूमिका काय? हे सर्व काही भाजपचेच विचार आहेत. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की, त्यांच्या पक्षाचे नेते हे अमित शाह आहेत, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाचे वाभाडे काढले आहेत.