मुंबई: कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. या नव्या युतीमुळे मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा धुसफूस सुरू झाली आहे. याचविषयी बोलताना शिवसेना UBT चे नेते संजय राऊत यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
'स्वत: मनसेचे प्रमुख राज ठाकरेंना ती भूमिका मान्य नाही. ती पक्षाची भूमिका नाही.. हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावर आमच्या लक्षात आलंय. पण तुम्हाला स्थानिक लोकांना जर अशाप्रकारची युती करायची होती तर कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना UBT सोबत युती करायला नको होती. आमची भूमिका कठोर आणि कडवट आहे शिदेंच्या बाबतीत. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय.' असं म्हणत संजय राऊतांनी कल्याण-डोंबिवलीतील युतीबाबत तीव्र नाराजी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
संजय राऊतांचा संताप, पाहा मनसेबाबत काय म्हणाले...
शह-काटशहामध्ये नितीमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये हेच आमचं म्हणणं आहे. कल्याण-डोंबिवलीत जे घडलं ती मनसेची पक्षाची भूमिका नाही असं सांगण्यात आलेलं आहे. स्वत: मनसेचे प्रमुख राज ठाकरेंना ती भूमिका मान्य नाही. ती पक्षाची भूमिका नाही.. हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावर आमच्या लक्षात आलंय. पण तुम्हाला स्थानिक लोकांना जर अशाप्रकारची युती करायची होती तर कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना UBT सोबत युती करायला नको होती. आमची भूमिका कठोर आणि कडवट आहे शिदेंच्या बाबतीत. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलाय.
'खरं म्हणजे तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात. तिथे ते महायुती म्हणून लढले. त्यामुळे तिथे एकत्र येऊन ते सरकार बनवू शकतात. इतरांना त्यात घुसायचं कारण नव्हतं हे माझं मत आहे. अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलाय. कोणत्या पातळीवर घेतलाय ते त्यांनी सांगितलंय.. यावर आम्ही अंतर्गत चर्चा करू.'
हे ही वाचा>> 'मनसे वारंवार भूमिका बदलतं..', पाहा निवडणुकीआधी 'या' प्रश्नावर काय म्हणालेले राज ठाकरे
'जेव्हा त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात येतंय की, हा स्थानिक पातळीवर घेण्यात आलेला निर्णय आहे आणि या निर्णयाची आम्हाला कल्पना नाही.. हे जेव्हा आम्हाला कोणी सांगतं तेव्हा आम्ही त्यांच्याशी अंतर्गत चर्चा करू ना.'
'जिथे अत्यंत अस्थिरता आहे तिथे आम्ही शिदेंसोबत कदापि जाणार नाही. इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्यासंदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील. पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही.'
'ज्या प्रकारे सोशल मीडिया, माध्यमं यातून संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. किंवा लोकांच्या मनात शिदेंविरोधात राग आहे मराठी माणसाबाबत. तो पाहिल्यावर लक्षात येईल की, अशाप्रकारची कोणतीही युती मराठी माणूस मान्य करत नाही.म्हणून मुंबईत आम्हाला यश का मिळालं? शिदेंना धडा शिकवायचा होता.. गद्दारांना धडा शिकवायचा होता. म्हणून मुंबईत यश मिळालं.'
हे ही वाचा>> KDMC: राज ठाकरेंच्या मनसेने पुन्हा बदलली भूमिका?, ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्यासोबतच गेले सत्तेत...
'त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले.. भाजप-शिंदेंचा पराभव करण्यासाठी. आता मला असं सांगण्यात आलं की, काही ठिकाणी शिवसेनेने अशा युती केल्या आहेत. मला तसं दिसत नाही. कणकवलीमध्ये एक आघाडी स्थापन झाली होती.. पण ती निवडणुकीपूर्वी. त्यात सर्वपक्षीय होते.. ती काही शिंदेंसोबत युती नव्हती. एक सर्वपक्षीय आघाडी एका नगरपंचायती निर्माण झाली. त्यात शिवसेना सामील झाली.'
'राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष असला तरी कल्याण-डोंबिवलीत ज्यांनी खालच्या स्तरावर शिदेंसोबतच्या युतीचा निर्णय घेतलाय त्यांची राजकारणातील विश्वासर्हता पूर्णपणे संपलीय. ज्या कोणी घेतला असेल कुठल्याही पातळीवर. त्यांच्याबाबत मराठी माणसामध्ये जो विश्वास निर्माण झाला होता तो पूर्णपणे संपला आहे.' असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT











