Indapur Politics : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना शह देण्यासाठी इंदापुरात विरोधकांची खेळी केलीये. विधानसभेत एकमेकांविरोधात निवडणूक लढलेले हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने एकत्र नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंदापुरातील राजकीय समीकरणं वेगाने बदलत आहेत. नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
इंदापुरात नगरपालिका निवडणुकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना शह देण्यासाठी विरोधक एकवटलेत. नगरपालिका निवडणुकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर पक्षातच बंडखोरी करत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दत्ता भरणे यांना चॅलेंज देत नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
हेही वाचा : राज्यात गेल्या 9 महिन्यांत 11532 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू; समृद्धी महामार्गाची आकडेवारी चिंतेत टाकणारी
इंदापूर नगरपालिकेमध्ये निष्ठावान कार्यकर्त्याला राष्ट्रवादीकडून संधी देण्यात यावी, यासाठी गारटकर आग्रही होते. मात्र, कृषिमंत्री भरणे यांनी शहा यांनाच उमेदवारी देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून गारटकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. इंदापूरमध्ये कृषिमंत्री भरणे यांना शह देण्यासाठी विधानसभेत एकमेकांच्या विरोधात लढलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजपाचे युवा नेते प्रवीण माने, माजी आमदार यशवंत माने एकवटले आहेत. या तिघांनीही आज इंदापूर शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. त्यानंतर राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले प्रदीप गारटकर यांच्यासाठी स्थानिक पातळीवर कृष्णा भीमा विकास आघाडी करण्याची घोषणा केली आहे. इंदापुरात विधानसभेला निवडणूक लढलेले दोन विरोधक आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे मात्र आता भाजपवासी झालेल्या यशवंत माने यांनी गारटकर यांना बळ दिलेय.
इंदापुरात विधानसभेच्या निवडणुकीत (2024) तिरंगी लढत झालेली पाहायला मिळाली. या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी 19,410 मतांनी विजय मिळवला होता. त्यांना 117,236 मतं मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी 97,826 तर प्रवीण माने यांनी 37,917 मत मिळवली होती. मात्र, आता नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आल्याने वेगळं चित्र पाहायला मिळणार का? असा प्रश्न विचारला जातोय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











