Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या कृत्यांना ब्रेक लावण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केलं आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताने एक मोठं पाऊल उचललं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, 'ऑपरेशन सिंदूर' ही सैन्य, हवाई दल आणि नौदलाची संयुक्त कारवाई होती. या कारवाईमध्ये दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला. या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. ही कारवाई पहाटे 1.30 च्या सुमारास करण्यात आली. हा हवाई हल्ला बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
भारताच्या हल्ल्यानंतर पाक पंतप्रधानांची प्रतिक्रिया
भारताच्या हवाई हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं की पाकिस्तानच्या भूमीवर पाच ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. पंतप्रधान शरीफ यांनी लिहिलं आहे की, 'या युद्धखोर कृत्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि ते प्रत्युत्तर दिलं जातंय.' त्यांनी असंही म्हटलं की पाकिस्तानचं सैन्य आणि लोक पूर्णपणे एकजूट आहेत आणि देशाचं मनोबल उंचावलं आहे.
हे ही वाचा >> सगळ्यात मोठी बातमी... भारताचा पाकिस्तानवर मध्यरात्री Air Strike, 9 दहशतवादी ठिकाणं केली बेचिराख!
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, "धूर्त शत्रूने पाकिस्तानमधील पाच ठिकाणी कहर माजवला आहे.
भारताला योग्य उत्तर देण्याचा किंवा युद्धाला योग्य उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि योग्य उत्तर दिले जाते. संपूर्ण राष्ट्र पाकिस्तानी सैन्यासोबत आहे आणि संपूर्ण पाकिस्तानी राष्ट्राचे मनोबल आणि आत्मा उच्च आहे.
पाकिस्तानी राष्ट्र आणि पाकिस्तानी सैन्याला शत्रू कसे वागतील हे चांगले माहित आहे.
शहबाज शरीफ म्हणाले, 'पाकिस्तानी सैन्य आणि राष्ट्राला शत्रूशी कसं वागायचं हे चांगलं माहिती आहे. आम्ही त्यांचे नापाक हेतू कधीही यशस्वी होऊ देणार नाही.
पाच ठिकाणी एअर स्ट्राईक?
दरम्यान, पाकिस्तानने भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध करत म्हटलं की, या हल्ल्यात तीन लोक ठार झालेत. "काही काळापूर्वी, 'कायर शत्रू'ने बहावलपूरच्या अहमद पूर्व भागात, सुभानुल्लाह मस्जिद, कोटली आणि मुझफ्फराबादमध्ये तीन ठिकाणी हवाई हल्ले केले," असं इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक (डीजी आयएसपीआर) लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले.
ADVERTISEMENT
