शरद पवारांचा वसुलीचा धंदा, 435 कोटी…, किरीट सोमय्यांनी सांगितलं प्रकरण

प्रशांत गोमाणे

• 08:58 AM • 15 Jan 2024

शरद पवार परिवार हा पैसै कसे ढापायचे हे संपूर्ण जगाला शिकवू शकतात. कारण कोविड काळात जेव्हा संपूर्ण जग घाबरलेलं आणि भीतीच्या सावटाखाली होतं. त्यावेळी यांनी (शरद पवार) इतक्या छानरित्या वसुलीचा धंदा केल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

follow google news

Kirit Somaiya Big Allegation on Sharad Pawar : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. शरद पवारांनी कोविड काळात वसुलीचा धंदा सुरु केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तब्बल 435 कोटी रुपये मिशन स्वरूपात त्यांच्या कंपनीतही वळते झाल्याचा मोठा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या या आरोपानंतर मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे आता सोमय्यांच्या या आरोपांवर आता शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (kirit somaiya big allegation on sharad pawar and prataprao pawar covide era maharashtra politics

हे वाचलं का?

किरीट सोमय्या माध्यमांशी बोलत होते. यावेळी शरद पवारांवर आरोप करताना सोमय्या म्हणाले की, शरद पवार परिवार हा पैसै कसे ढापायचे हे संपूर्ण जगाला शिकवू शकतात. कारण कोविड काळात जेव्हा संपूर्ण जग घाबरलेलं आणि भीतीच्या सावटाखाली होतं. त्यावेळी यांनी (शरद पवार) इतक्या छानरित्या वसुलीचा धंदा केल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला. सोमय्या इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी संबंधित कपनीचे नाव आणि या कंपनीच्या खात्यात किती पैसै खात्यात वळते झाल्याचा याचा देखील किरिट सोमय्या यांनी खुलासा केला.

हे ही वाचा : Mahayuti : “मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते”, सदाभाऊंनी भाजपवर काढली भडास

किरीट सोमय्या यांनी यावेळी न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड या कंपनीचे नाव घेतले. ही कंपनी शरद पवारांचे भाऊ प्रतापराव पवार यांची आहे. या कंपनीत तब्बल 12 वर्ष दमडीचाही व्यवहार झाला नव्हता. पण कोविड काळात म्हणजे मार्च 2021 मध्ये सीरम इंस्टीस्ट्यूटने कोवीडशिल्ड बनवणाऱ्या कंपनीच्या खात्यातून 435 कोटी रूपये शरद पवार परिवाराच्या प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आले.यामध्ये यांचे कॉन्ट्र्युब्युशन 1 लाख रूपये आहे. त्यामुळे केवळ 1 लाख योगदान असताना त्यांच्या खात्यात जमा झालेले 435 कोटी रुपये कमिशन आहे का ? असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळावी यासाठी किरीट सोमय्या यांनी निगडी येथील पीएमआरडीमध्ये अर्ज केला आहे.
याबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर खुलासा करेन असे देखील सोमय्या म्हणाले आहेत. त्यामुळे आता सोमय्या यांच्या या आरोपावर आता शरद पवार गट काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp