‘मोदी’ आडनाव वाद : ललित मोदींचा राहुल गांधींना इशारा; आता ब्रिटनच्या कोर्टात द्यावा लागणार लढा?

मुंबई तक

• 05:27 PM • 30 Mar 2023

मोदी’ आडनावावरुन सुरु झालेला वाद अद्यापही थांबताना दिसत नाही. भारतातील वादाची राळ खाली बसल्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीगचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना इशारा दिला आहे.

Lalit Modi warns Rahul Gandhi to file a case in UK court over his statement on Modi surname

Lalit Modi warns Rahul Gandhi to file a case in UK court over his statement on Modi surname

follow google news

 Modi | Rahul Gandhi :

हे वाचलं का?

मुंबई : ‘मोदी’ आडनावावरुन सुरु झालेला वाद अद्यापही थांबताना दिसत नाही. भारतातील वादाची राळ खाली बसल्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीगचे माजी प्रमुख ललित मोदी (Lalit Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना इशारा दिला आहे. मोदी आडनाववरील वक्तव्यावरुन ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसंच त्यांनी आपल्याला फरारी संबोधल्याबद्दलही काँग्रेसला फटकारलं आहे. आपल्याला अद्याप कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवलेलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. मोदी आडनावाच्या वक्तव्यामुळे नुकतचं राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. (Lalit Modi warns Rahul Gandhi to file a case in UK court over his statement on Modi surname)

ललित मोदी काय म्हणाले?

ट्विट करत ललित मोदी म्हणाले,’मी प्रत्येक साध्या-सुध्या माणसाला बघतोय त्यातही राहुल गांधींशी संबंधित व्यक्ती वारंवार मला फरार म्हणून हिणवत आहेत. का? कसं? मला या प्रकरणात अद्याप दोषी ठरवण्यात आलेलं नाही. मी पप्पू उर्फ राहुल गांधींसारखा नाही, मी एक सामान्य नागरिक आहे. मला असं वाटतं की विरोधी पक्षाच्या नेत्यांना सध्या काही काम उरलेलं नाही. एकतर त्यांच्याकडे चुकीची माहिती आहे किंवा ते सूडबुद्धीने बोलत आहेत.

Modi Surname case : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; ‘मोदी’ प्रकरण काय?

ललित मोदी म्हणाले, मी लवकरात लवकर ब्रिटनच्या न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध खटला दाखल करणार आहे. मला खात्री आहे की त्यांना काही ठोस पुराव्यांसह यावं लागेल. मी त्यांना स्वतःला वेडं सिद्ध होताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.

यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना टॅग करत ललित मोदी यांनी दावा केला की, ज्या नेत्यांची परदेशात मालमत्ता आहे, त्यांचा पत्ता आणि फोटो पाठवू शकतो. काँग्रेस नेते आरके धवन, सीताराम केसरी, मोतीलाल वोहरा नारायण दत्त तिवारी आणि कमलनाथ यांच्या नावाचा उल्लेख करत ललित मोदी म्हणाले, यांना विचारा तुमच्या सर्वांची परदेशात मालमत्ता कशी? मी पत्ते आणि फोटो पाठवू शकतो. भारतातील जनतेला मूर्ख बनवू नका. देशावर राज्य करण्याचा अधिकार असल्यासारखं गांधी घराणं वागतं. मी एका पैशाचाही गंडा घातल्याचे आजपर्यंत सिद्ध झालेले नाही. पण मी जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा तयार केली, ज्याने सुमारे 100 अब्ज डॉलर कमावले, असा दावाही त्यांनी केला.

Rahul Gandhi 8 वर्ष लोकसभेत दिसणार नाहीत? काय आहे कारण, वाचा सविस्तर

राहुल गांधी काय म्हणाले होते?

राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकमध्ये एक विधान केलं होतं, यात त्यांनी म्हटलं होतं की, “सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?” त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सुरत सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पण त्यांना तात्काळ जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

    follow whatsapp