Udgir News, अनिकेत जाधव : राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी सगळेच पक्ष कामाला लागले असून राजकीय पक्षांनी तिकिट वाटपाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर लातूरच्या उदगीरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत वडिलांना उमेदवारी नाकारल्याच्या रागातून एका तरुणाने चक्क आमदाराच्या कार्यालयाबाहेर मूत्रविसर्जन करत आपला निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पलाश मुच्छलने स्मृती मानधनाच्या बालमित्राला 40 लाखांचा गंडा घातला, सांगलीच्या पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल
..म्हणून केले मूत्रविसर्जन
राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लातूरमधील उदगीर येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मधुकर एकुर्गे यांनी आमदार संजय बनसोडे यांच्याकडे निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकिट नाकारण्यात आले. याच रागातून त्यांचा मुलगा नितीन एकुर्गे याने 21 जानेवारीच्या सायंकाळी नितिनने संजय बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर मूत्रविसर्जन केले. याचा व्हिडिओ बनवून त्याने सोशल मीडियात पोस्टही केला.
काही तासांमध्येच व्हिडिओ केला डिलिट
नितीन एकुर्गे याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच जोरदार चर्चा रंगली. यानंतर काही तासांमध्येच त्याने हा व्हिडिओ डिलिट केला. मात्र काही तासांमध्येच सोशल मीडियात अनेक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यामुळे उदगीरसह संपूर्ण राज्यात याची चर्चा रंगल्याचे पहायला मिळत आहे.
हे ही वाचा : 'मनसे वारंवार भूमिका बदलतं..', पाहा निवडणुकीआधी 'या' प्रश्नावर काय म्हणालेले राज ठाकरे
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी?
काही दिवसांपूर्वीच राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणुक आयोगाने केली आहे. यानुसार, 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणुक होणार आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत 16 ते 21 जानेवारी असून अर्ज माघारीची मुदत 27 जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी रोजी जाहिर होईल. यानंतर 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे.
ADVERTISEMENT











