Lok Sabha : शरद पवारांमुळे अजित पवारांचा होणार गेम? खळबळ उडवणारा सर्व्हे

प्रशांत गोमाणे

12 Mar 2024 (अपडेटेड: 12 Mar 2024, 11:47 PM)

Ajit Pawar Vs Sharad Pawar : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याने जनता नेमकी शरद पवारांच्या की अजित पवारांच्या बाजूने उभी राहते? हे देखील पाहणे निर्णायक ठरणार आहे. या संदर्भातील देखील एक सर्वे समोर आला आहे.

lok sabha election 2024 ajit pawar sharad pawar ncp splite sakal media survay lok sabha election ncp political crisis

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याने जनता नेमकी शरद पवारांच्या की अजित पवारांच्या बाजूने उभी राहते?

follow google news

Sakal Media Survey, Ajit Pawar Vs Sharad Pawar :आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याने जनता नेमकी शरद पवारांच्या की अजित पवारांच्या बाजूने उभी राहते? हे देखील पाहणे निर्णायक ठरणार आहे. या संदर्भातील देखील एक सर्वे समोर आला आहे. या सर्वेत जनतेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. त्यामुळे अजित पवारांना मोठा झटका बसणार आहे.  (lok sabha election 2024 ajit pawar sharad pawar ncp splite sakal media survay lok sabha election ncp political crisis)

हे वाचलं का?

गेल्या वर्षी जून महिन्यात राष्ट्रवादीत मोठी फुट पडली होती. अजित पवार काही नेत्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाऊन सत्तेत सामील झाले होते. यानंतर अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला होता. त्यावर आधी निवडणुक आयोगाने व नंतर विधानसभा अध्यक्षांनी अजित पवारांना खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली आणि त्यांनी घड्याळ चिन्ह दिले होते. त्यानंतर शरद पवारांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि तुतारी (तुतारी फुंकणारा माणूस) हे चिन्ह दिलं होतं. 

हे ही वाचा : 'या' तीन तालुक्यातील राजकारण अजित पवारांचं गणित बिघडवणार?

सकाळच्या मीडिया ग्रुपने एक सर्वे केला आहे. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत आपण कोणत्या पक्षाची निवड कराल? असा प्रश्न विचारण्यात आला होता.  या प्रश्नावर अनेकांनी शरद पवारांच्या बाजून कौल दिला आहे. त्यामुळे अजित पवारांना धक्का बसणार आहे. 

सकाळच्या या सर्वेक्षणात 34 हजार 978 लोकांनी आपली मतं मांडली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला 12.6 टक्के लोकांनी पसंती आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3.9 टक्के लोकांची पसंती आहे. त्यामुळे पक्षफुटीचा अजित पवारांना मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे. 

दरम्यान 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर त्यावेळेस राष्ट्रवादीला 15.66 टक्के मतं मिळाली होती. आणि या सर्वेक्षणात देखील पक्षाला जवळपास तेवढेचं मतं मिळताना दिसत आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांना मिळालेल्या पसंतीच्या टक्केवारीची बेरीज 16.6 टक्के इतकी होतेय. पक्षात दोन गट पडल्याने मत देखील विभागली आहे. यामध्ये शरद पवारांना दिलामा मिळणार आहे. तर अजित पवारांसाठी धक्का असणार आहे. 

हे ही वाचा : Rahul Kaswan : भाजप खासदाराला काँग्रेसने दिले तिकीट, यादीत कुणाची नावे?

दरम्यान सकाळ माध्यमाने केलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 48 लोकसभा, विधानसभा निहाय विभागून सर्वेक्षण करण्यात आले आहे. या अंतर्गत लिंग, वय, जात, धर्म, कुटुंबाची आर्थिक स्थिती, वेगवेगळे उत्पन्न गट, सरकारी योजनांचे लाभार्थी, नवं मतदार असे निकष निश्चित केले होते. तसेच सर्वेक्षणात 2024 च्या उमेदवारांबद्दल कल समजून घेण्यात आलेला नाही. मात्र सर्वेक्षण सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल कल सांगणारे आहेत. 

    follow whatsapp