Rahul Kaswan : भाजप खासदाराला काँग्रेसने दिले तिकीट, यादीत कुणाची नावे?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

congress announces second list of 43 candidate rahul kaswan join congress yesterday and today become candidate from churu lok sabha
काँग्रेसने छिंदवाडामधून कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना तिकीट दिले आहे. तर अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांना जालोरमधुन उमेदवारी देण्यात आली आहे.
social share
google news

Rahul kaswan candidate from churu lok sabha : आगामी लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर करताना भापजने अनेक विद्यमान खासदाराची तिकीट कापली होती. त्यामुळे अनेक खासदार नाराज झाले होते. यापैकी एक असलेले खासदार राहुल कासवान (Rahul kaswan)  यांनी बंडखोरी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर आता काँग्रेसने त्यांना राजस्थानच्या चुरूचे लोकसभा (churu lok sabha) मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवताना दिसणार आहेत.  (congress announces second list of 43 candidate rahul kaswan join congress yesterday and today become candidate from churu lok sabha)

ADVERTISEMENT

काँग्रेसकडून आज दुसरी उमेदवारी यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत 43 उमेदवारांची नावे आहेत. काँग्रेसकडून या यादीत 7 जनरल, 13 ओबीसी, 10 एससी, 9 एसटी आणि एका मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसने छिंदवाडामधून कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना तिकीट दिले आहे. तर अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांना जालोरमधुन उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच नुकतेच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले राहुल कासवान यांना देखील चुरू मतदार संघातून तिकीट देण्यात आले आहे. 

हे ही वाचा : भाजपने भाकरी फिरवली, पाच तासांत बदलला मुख्यमंत्री, कारण...

भाजपने तिकीट कापलं 

राहुल कासवान हे भाजपच्या चिन्हावर दोन वेळा खासदार राहिले आहेत. राहुल यांचे वडील रामसिंह कासवान तीनवेळा भाजपचे खासदार राहिले आहेत. दरम्यान भाजपने पहिल्या यादीत 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यामध्ये चुरु येथून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राहुल कासवान यांनी पक्षाचा निर्णय मान्य नसल्याचे म्हटलं होत.त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांना काँग्रेसने चुरु लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Vasant More : ठाकरेंची साथ सोडणारे वसंत मोरे आहेत तरी कोण?

दरम्यान भाजपकडून तिकीट नाकारल्यानंतर राहुल कासवान यांनी एक्सवर नाराजी व्यक्त केली होती. "माझा गुन्हा काय होता? मी प्रामाणिक नव्हतो का? मी कष्टाळू नव्हतो का? मी विश्वासू नव्हतो का? मी कलंकित होतो? काम पूर्ण करण्यात मी कोणतीही कसर सोडली का? पंतप्रधानांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीत मी आघाडीवर होतो. अजून काय हवे होते? मी जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा सगळेच थक्क व्हायचे. याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही."  असे कासवान म्हणाले होते. 

या सर्व घडामोडीनंतर राहुल कासवान यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोमवारीच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाअर्जुन यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. या प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या तिकीटावर आता ते निवडून येतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT