मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत, 15 ठिकाणी महिला राज

Mahapalika reservation draw for the mayoral posts : महापालिकेतील सत्ता स्थापनेत पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ही सोडत आहे. या सोडतीनंतर महापौरपद आरक्षित आहे की खुले हे स्पष्ट होईल. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौरपदाची आरक्षण सोडत निघेल. हे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाईल. याआधीचे आरक्षण बाजूला ठेवण्यात येईल. या आरक्षणासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला आहे.

Mahapalika reservation draw for the mayoral posts

Mahapalika reservation draw for the mayoral posts

मुंबई तक

22 Jan 2026 (अपडेटेड: 22 Jan 2026, 11:09 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत,

point

15 ठिकाणी महिला राज, इच्छुकांची धाकधूक वाढली

Mahapalika reservation draw for the mayoral posts : मुंबईसह महाराष्ट्रातील एकूण 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आज (दि.22) आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण असल्याने तब्बल 15 महापालिकांमध्ये महिला महापौर होणार आहे. तर उर्वरित 14 महापालिकांमध्ये सर्वसाधारण वर्गाला महापौरपदाची संधी मिळणार आहे.

हे वाचलं का?

महापालिकेतील सत्ता स्थापनेत पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ही सोडत आहे. या सोडतीनंतर महापौरपद आरक्षित आहे की खुले हे स्पष्ट होईल. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौरपदाची आरक्षण सोडत निघेल. हे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाईल. याआधीचे आरक्षण बाजूला ठेवण्यात येईल. या आरक्षणासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला आहे.

हेही वाचा : बीड हादरलं! बायकोचं परपुरुषाशी अनैतिक संबंध, नवऱ्याने बायकोच्या त्रासाला कंटाळून साडीने गळाफास घेत संपवलं जीवन

कसं असेल आरक्षणाचं स्वरुप?

महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार राज्यातील महापौरपदांच्या वाटपात महिलांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलांसाठी आरक्षित असलेल्या 15 महापालिकांपैकी 4 महापालिकांमध्ये महिला ओबीसी वर्गासाठी आरक्षण असेल, तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव राहणार आहे. उर्वरित 2 जागा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असतील. दरम्यान, अनुसूचित जमातीसाठी केवळ एकच जागा येत असल्याची माहिती आहे. मात्र, नगरविकास विभागाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार जर एखाद्या प्रवर्गासाठी एकच जागा येत असेल, तर त्या ठिकाणी आरक्षण लागू होत नाही. त्यामुळे अनुसूचित जमातीसाठी महापौरपदाचे स्वतंत्र आरक्षण यावेळी लागू होणार नाही. उर्वरित खुल्या प्रवर्गातील 17 महापालिकांमध्येही महिलांना 50 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होतील, तर 8 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांना संधी मिळणार आहे.

कोणत्या महापालिकांसाठी होणार आरक्षण सोडत ? 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी-निजामपूर, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, मालेगाव, धुळे, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर, छत्रपती संभांजीनगर, परभणी, जालना, लातूर, नांदेड

इतर महत्त्वाच्या बातम्या 

KDMC: राज ठाकरेंच्या मनसेने पुन्हा बदलली भूमिका?, ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्यासोबतच गेले सत्तेत...

    follow whatsapp