सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? राहुरीत काय होणार? बघा, काय सांगतो एक्झिट पोल..

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. पोल पंडित या संस्थेकडून हा एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Maharashtra By Elections Exit Poll

Maharashtra By Elections Exit Poll

मुंबई तक

25 Apr 2026 (अपडेटेड: 25 Apr 2026, 01:02 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित

point

राहुरीत काय होणार?

point

काय सांगतो एक्झिट पोल?

Maharashtra By Elections Exit Poll : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. यानुसार या दोन्ही जागांवर महायुती विजयी होताना दिसत आहे. पोल पंडित या संस्थेकडून हा एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर या दोन्ही जागी पोटनिवडणूक लागली होती. मतदारांची सहानुभूती, महायुतीतील नेत्यांचा सक्रिय सहभाग आणि सक्षम विरोधी उमेदवाराचा अभाव यामुळे या दोनही जागा महायुतीच्या पारड्यात गेल्याचे या एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

बारामती पोटनिवडणूकीचा एक्झिट पोल काय सांगतो?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिकामी झाली होती. या जागी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. पोल पंडित या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, सुनेत्रा पवार 1 लाख 90 हजार ते 2 लाख मताधिक्याने विजयी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल असणारी सहानुभूती, महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची प्रचारात असणारी सक्रियता आणि सक्षम विरोधी उमेदवाराचा अभाव यामुळे सदर निवडणुकीस एकतर्फी स्वरूप प्राप्त झाल्याचे या एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत 58 टक्के मतदान झाले असून यापैकी 85 ते 90 टक्के मतं सुनेत्रा पवार यांना मिळण्याची शक्यता आहे.  

हे ही वाचा : उल्हासनगर : विरोधी पक्षनेता निवडीवरुन भाजप नगरसेवकांचा राडा, महापालिकेत शिवसेना–भाजप युती तुटण्याच्या मार्गावर?

राहुरी पोटनिवडणूकीचा एक्झिट पोल काय सांगतो?

शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिकामी झाली होती. या जागी भाजपकडून अक्षय कर्डिले यांनी निवडणूक लढवली. पोल पंडित या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, अक्षय कर्डिले हे 95 हजार ते 1 लाख 5 हजार मतांच्या मताधिक्याने  विजयी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दिवंगत शिवाजी कर्डिले यांच्याबद्दल असणारी सहानुभूती, भाजपचे मजबूत संघटन, जिल्ह्यातील भाजप नेत्यांची प्रचारातील सक्रियता आणि विरोधी उमेदवारांचा मर्यादित प्रभाव यामुळे कर्डिले विजयी होणार असल्याची शक्यता या पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीत 56 टक्के मतदान झाले असून यापैकी 70 ते 75 टक्के मतं अक्षय कर्डिले यांना मिळण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : रत्नागिरी : बायपास ऑपरेशन झाले अन् छातीवर लाथाबुक्क्यांनी प्रहार करुन केली हत्या; खेड पोलिसांची मोठी कारवाई

राहुरीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराचे काय होणार?

राहुरीत अक्षय कर्डिले यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी निवडणूक लढवली होती. पोल पंडित या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, मोकाटे यांना 15 ते 20 टक्के मतं मिळणार असल्याची शक्यता आहे. तसेच अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 6 ते 10 टक्के मतं मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.