Manoj Jarange : 'मराठ्यांच्या नावावर पातळी सोडून...', भाजप नेत्याने जरांगेंना सुनावलं

Manoj Jarange, Maratha Reservatrion : जरांगेंनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मनोज जरागेंना सुनावलं आहे. मनोज जरांगे दिवसेंदिवस देवेंद्र फडणवीसांवर पातळी सोडून बोलत आहेत. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाचा मूळ उद्देश महाराष्ट्रासमोर आला आहे,

maratha reservation bjp spokeperson keshav upadhye criricize manoj jarange patil devendra fadnavis sagar bunglow

जरांगेंनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मनोज जरागेंना सुनावलं आहे.

प्रशांत गोमाणे

• 06:09 PM • 25 Feb 2024

follow google news

Manoj Jarange, Maratha Reservatrion : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरावली सराटीतील बैठकीतून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर जरांगे पाटील थेट सागर बंगल्याच्या दिशेने निघाले आहेत. जरांगेंनी फडणवीसांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav upadhye)  यांनी मनोज जरागेंना (manoj jarange)  सुनावलं आहे. (maratha reservation bjp spokeperson keshav upadhye criricize manoj jarange patil devendra fadnavis sagar bunglow) 

हे वाचलं का?

मनोज जरांगे दिवसेंदिवस देवेंद्र फडणवीसांवर पातळी सोडून बोलत आहेत.  त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाचा मूळ उद्देश महाराष्ट्रासमोर आला आहे. आता मराठा बांधवांच्या नावावर जरांगेंना आणखी किती पातळी सोडून बोलू द्यायचं याचा निर्णय आता स्वतः मराठा समाजाने घ्यावा,असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : Manoj Jarange : 'आम्ही सांगितलं होतं फडणवीसांचं नाव...', भाजप आमदार जरांगेंना काय बोलला?

केशव उपाध्ये यांचं ट्विट जसंच्या तसं 

मनोज जरांगे हे मा. देवेंद्र फडणवीस जी बद्दल दिवसेंदिवस पातळी सोडत आहे. संपूर्ण मराठा समाजाच्या नावाखाली जरांगे जे बोलत आहे, ते समाजालाही मान्य नसेल.

जरांगे आज जे बडबडत आहे, त्यावरुन त्यांच्या आंदोलनाचा मूळ उद्देश महाराष्ट्रासमोर आला आहे.

ज्या मा. देवेंद्रजींनी मराठा समाजाला आरक्षण देऊन उच्च न्यायालयात टिकवून दाखवलं, मराठा युवकांसाठी विविध योजना आणल्या, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सक्षम केलं, सारथीच्या माध्यमातून तरुणांना IAS/IPS होण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या, यांच्याबद्दल बोलताना काहीही वाटू नये?

मराठा बांधवांच्या नावावर जरांगेंना आणखी किती पातळी सोडून बोलू द्यायचं याचा निर्णय आता स्वतः मराठा समाजाने घ्यावा !

हे ही वाचा : ''वंचित'महाविकास आघाडीचाच एक घटक', राऊतांनी स्पष्टच सांगितलं...

नितेश राणे काय म्हणाले? 

 जरागेंचा हा लढा मराठा आरक्षणासाठीचा आहे की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी असा सवाल नितेश राणे यांनी जरांगेंना केला आहे. तसेच जरांगेंच्या हाती कुणाची स्क्रिप्ट आहे, त्यांच्या स्क्रिप्टमधून आता तुतारीचा वास येऊ लागलाय,अशी टीका नितेश राणे यांनी जरांगेवर केली आहे. तसेच हा लढा मराठा समाजाचा असेल तर त्यांनी तो समाजापर्यंतच मर्यादीत ठेवावा असा सल्ला देखील नितेश राणे यांनी जरांगेंना दिला. त्यासोबत सांगर बंगल्यापुढे एक भिंत आहे ती ओलांडणे त्यांना अवघड जाईल,असा इशारा नितेश राणे यांनी जरांगेंना दिला आहे. नितेश राणे यांनी टीव्ही 9  मराठीला प्रतिक्रिया दिली होती. 

 

    follow whatsapp