Manoj Jarange : 'आम्ही सांगितलं होतं फडणवीसांचं नाव...', भाजप आमदार जरांगेंना काय बोलला?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

मनोज जरांगे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप.
Prasad lad criticised manoj jarange patil
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे फडणवीसांविरुद्ध आक्रमक

point

आमदार प्रसाद लाड जरांगेंवर भडकले

point

मनोज जरांगेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप

prasad lad Manoj Jarange Patil Maratha reservation : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंनी नौटंकी बंद करावी, असे म्हणत उत्तर दिलं आहे. 

ADVERTISEMENT

प्रसाद लाड म्हणाले की, "मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद पाहिली. आता तरी नौटंकी बंद करावी. समाजाच्या नावाखाली मागच्या सात-आठ महिन्यात स्वतःचा राजकीय वरदहस्त करण्याचा प्रयत्न जरांगे पाटील करत होते."

सिल्व्हर ओक की भैय्या फॅमिली? लाडांचा सवाल

लाड यांनी पुढे म्हटलं आहे की, "त्याचा मागचा बोलविता धनी कोण आहे, हे त्यांनी सांगावं. सिल्व्हर ओक आहे की, जालन्यातील भैय्या फॅमिली आहे. हे खरं खरं आता लोकांसमोर यायला लागलं आहे. आम्ही तुम्हाला दहा वेळा सांगितलं होतं की, फडणवीसांचं नाव घेऊ नका."

हे वाचलं का?

"ज्या फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार आहेत, त्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्या फडणवीसांचं सारखं सारखं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावत आहे, हे आज जनतेसमोर आलं आहे. पुन्हा एकदा १० टक्के आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळलेली खेळी संपली हे तुमच्या आजच्या पत्रकार परिषदेतून परिस्थिती लक्षात येते", असं उत्तर लाड यांनी जरांगेंना दिलं.

हेही वाचा >> तरुणी ट्रग्जच्या नशेत..., पुण्यातील व्हिडीओने राज्यात खळबळ  

"तुमचं दुःख लक्षात येतं. त्यामुळे समाजाच्या नावावर लेकरू लेकरू म्हणून ढेकर देण्याचं बंद करा. समाजाला माहिती पडलं आहे.या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे. समाज खूश आहे आणि तुमच्या सल्ल्याची समाजाला गरज नाही", असे म्हणत लाड यांनी जरांगेंवर टीकास्त्र डागलं आहे.  

ADVERTISEMENT

मनोज जरांगेंनी फडणवीसांवर काय केले आरोप?

अंतरवाली सराटीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, "हे सगळं करतोय ते फक्त देवेंद्र फडणवीस. मराठ्यांचा दरारा पुन्हा निर्माण झाला आहे आणि हा दरारा संपवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. संपवायचं तर मराठ्याच्याच हाताने संपवायचं. यात एकनाथ शिंदेंचेही दोन-चार लोक आहेत. अजित पवारांचेही दोन आमदार आहेत." 

ADVERTISEMENT

"सगेसोयरेचं होऊ देत नाहीत आणि १० टक्के मराठ्यांवर लादायचं काहीही करू आणि हे पोरग (मनोज जरांगे) होऊद देत नाही. हे पोरग इथेच संपलं पाहिजे नाहीतर याचा गेम तरी करावा लागेल. नसता याला बदनाम तरी करावं लागेल किंवा उपोषणात मरू द्यावं लागेल. सलाईनमधून विष देऊन तरी... म्हणून मी परवा रात्री सलाईन बंद केलं. याचं एन्काऊंटर तरी करावं लागेल हे देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न आहे." 

हेही वाचा >> 'सागर बंगल्यावर येतो, घे माझा बळी', अंतरवाली सराटीत प्रचंड गोंधळ

"हे देवेंद्र फडणवीसला वाटत. देवेंद्र फडणवीसला एवढीच खुमखुमी आहे ना, तर बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखव. तुला माझा बळी घ्यायचा ना... तुला माझा बळी पाहिजे ना, मी सागर बंगल्यावर येतो घे माझा बळी, पण समाजासोबतची ईमानदारी मी नाही विकू शकत", असे आरोप जरांगे पाटलांनी केले आहेत. त्यांच्या आरोपानंतर आता राज्यात खळबळ उडाली आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT