'वंचितला आम्ही 'त्या' जागा द्यायला तयार',राऊतांनी 'मविआ'ची भूमिका सांगितली

मुंबई तक

ADVERTISEMENT

samjay raut prakash ambedkar
samjay raut prakash ambedkar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'वंचित' महाविकास आघाडीचाच घटक

point

वंचितला आम्ही सन्मानानं बोलवलं

Sanjay Raut: 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) भाजप आणि त्यांची पिलावळ हे देशाचे संविधान मानायला तयार नसल्याचे सांगत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर घणाघात केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) जे म्हणत आहेत ती लोकशाही त्यांच्या बापानी आणलेली आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि वंचित लोकसभेसाठी एकत्रच लढणार असल्याचे सांगत वंचितला कोणत्या जागा हव्या त्या द्यायला आम्ही तयार असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

ADVERTISEMENT

लोकशाही संपवण्याचं षडयंत्र

भाजपकडून देशातील लोकशाही संपवण्याचं काम चालू आहे. मात्र तसं मात्र होणार नाही कारण आता देशातील अनेक पक्ष एकत्र येत लोकशाही विरोधी असणाऱ्या पक्षाविरोधात एकत्र येत आहेत. त्यामुळे भाजपला देशातील लोकशाही संपवणं सोपं नाही असा विश्वासही खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

एका रात्रीत भाजप संपेल

देशातील सगळ्या आमदार-खासदारांनी जर ठरवलं तर एका रात्रीच भजाप संपून जाईल असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. कारण आज सत्तेत असलेल्या भाजपकडे निम्म्याहून जास्त खासदार हे पक्षांतर  करून आलेले आहेत. त्यामुळे आमच्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीच भाजप संपून जाईल असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

हे वाचलं का?

'वंचित' आघाडीचाच घटक

खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीविषयी बोलताना सांगितले की, 'वंचित' आता महाविकास आघाडीचाच एक घटक आहे. त्यामुळे 27 तारखेला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आम्ही 'वंचित'ला सन्मानानं बोलवलं आहे. त्यामुळे वंचितबरोबर चर्चा करून आम्ही आगामी निवडणुकीवर चर्चा करणार आहे.

'वंचित'ला सन्मानानं आमंत्रण 

'प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचाच घटक आहे. महाविकास आघाडीचा घटक करून घ्या अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेतली जाणार' असल्याचंही त्यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

चर्चा एकत्रच होणार

संजय राऊत यांनी सांगितले की, 'वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलेला असून त्यांच्या काही भूमिका जाहीरपणे ते मांडत आहेत, मात्र त्यांचा तो वेगळा प्रश्न आहे. 27 रोजी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठक आहे. त्या बैठकीला आम्ही वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलं आहे, आणि त्यांनी येण्याचाही मान्य केलं आहे त्यामुळे त्या बैठकीतच जागा वाटपाची चर्चा एकत्र होईल असंही त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

आम्ही तयार

'प्रकाश आंबेडकर ज्या प्रमाणे सांगतात, तसे जागावाटप जगाच्या राजकारणात कुठेही होत नाही, त्यामुळे त्यांना कोणत्या जागा हव्यात ते त्यांना द्यायला आम्ही तयार आहोत' असंही खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> Manoj Jarange : 'लोणावळ्याच्या बंगल्यात काय डील झाली?'

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT