Sanjay Raut: 'भाजपच्या बापाचा पत्ता आहे का?', राऊतांचा भाजपवर घणाघात

मुंबई तक

22 Feb 2024 (अपडेटेड: 22 Feb 2024, 10:33 AM)

'भाजपला एक बाप असता तर त्यांनी त्यांची सत्ता स्थापन केली असती, म्हणून त्यांनी दुसऱ्यांच्या पक्षातील आमदारांना खोके देऊन सरकार स्थापन केले' असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

Sanjay Raut Devendra fadnavis

Sanjay Raut Devendra fadnavis

follow google news

Sanjay Raut: भाजपकडून सध्या ज्या प्रकारचे राजकारण चालू आहे, ते बघून देशातील लोकशाहीची ही थट्टा चालू असल्याचे दिसून येत असल्याचा घणाघात खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. भाजपकडून ज्या प्रकारे 370 पार अशी चर्चा केली जाते आहे. ती खरं तर लोकशाहीची थट्टा आहे कारण त्या जागा जिंकण्यासाठी तुम्ही आधीच यंत्रणा ताब्यात घेतली आहे असा जाहीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी संजय राऊत यांनी भाजपचा (BJP) बाप काढत, आमचा बाप बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आहेत, मात्र भाजपला एक बाप नसल्याचाही त्यांनी घणाघात केला आहे.

हे वाचलं का?

 साधेपणानं जगा 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशेखर बावनकुळे यांनी साधेपणानं जगा म्हणून सांगतात. मात्र भाजपच्या प्रत्येत नेत्याकडे महागड्या परदेशी कार, घड्याळ वापरतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही लाखो रुपयांचे कोट वापरतात, त्यांच्या खिशाला लावलेल्या पेनची किंमतच पंचवीस लाख आहे. तरीही बावनकुळे सांगतात साधेपणानं जगा याचा अर्थ असा की, मोदी करतात तसं गरीबीचं ढोंग करा असा टोलाही त्यांनी राज्य आणि केंद्रावर टोला लगावला.

भाजपला बाप नाही

संजय राऊत यांनी भाजपवर आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल केला. ज्यांनी 50 खोके देऊन  गद्दार लोकांना घेऊन सरकार बनवलं त्यांनी लोकशाहीवर आणि सरकारवर स्वाभिमानानं बोलू नये. कारण भाजपला एक बाप राहिला नाही. भाजपला अनेक बाप असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली आहे. 

बेकायदेशीर सरकार

आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहे भाजपसारखं आमचं नाही. भाजपला एक बाप नाही अशी टीका करत तुमच्या बापाचा पत्ता आहे का तुम्हाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कारण भाजपला खरा बाप असता तर त्यांनी खोके देऊन बेकायदेशीर सरकार स्थापन केले नसते असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. 

फडणवीसांकडून मुंबईचा सौदा 

महानंद डेअरीवरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सरकारची महानंदा डेअरी तुम्हाला चालवता आली नाही. म्हणून तुम्ही ती गुजरातला दिली आहे. त्याच प्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुंबईचा सौदा करायला निघाले आहेत असा गंभीर आरोपही राऊतांनी फडणवीसांवर केला आहे.

    follow whatsapp