Majhi Ladaki Bahin Yojana : उत्पन्नाचा दाखलाही नाही, रेशन कार्डही नाही...फडणवीसांनी सांगितला कसा मिळणार योजनेचा लाभ?

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांनाही टोला लगावला. विरोधक सावत्र भावासारखे आपल्या योजनेचा विरोध करतात आणि सख्खे भाऊ असल्याचा आवं आणतात. पण आता यांचीच लोक गावागावात फॉर्म घेऊन उभे आहेत. त्यांच्यात खिशातून पैसे देणार आहेत, असे घरोघरी फिरु लागले आहे.

आपण या योजनेतील सगळ्या अटीशर्थी काढून टाकल्या आहेत.

mukhmantri majhi ladaki bahin yojana devendra fadnavis big statement income certificate ration card

सौरभ वक्तानिया

• 09:03 PM • 06 Jul 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

योजनेतील सगळ्या अटीशर्थी काढून टाकल्या आहेत.

point

सध्या ऑफलाईन, अॅपवरही फॉर्म भरले जातायत.

point

बँकेचे अकाऊंट नंबर लिहताना चुक करू नका

Majhi Ladaki Bahin Yojana, Devendra Fadnavis : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिला वर्गाची धावपळ सुरु आहे. या योजनेत अनेक त्रुटी देखील आहेत, या त्रुटी सरकार सोडवते आहे. या योजनेसाठी महिलांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे. मात्र महिलांची तलाठी आणि सेतू कार्यालयात होणारी गर्दी पाहता सरकारने महिलांना दाखल्यावर पर्याय म्हणून पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड देण्याची मागणी केली होती. मात्र ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखलाही नाही, रेशनकार्डही नाही, अशांना या योजनेचा लाभ कसा मिळणार? असा मोठा प्रश्न होता. यावर आता देवेंद्र फडणवीसांनी तोडगा काढला आहे.   mukhmantri majhi ladaki bahin yojana devendra fadnavis big statement income certificate ration card 

हे वाचलं का?

महायुतीची षण्मुखानंदमध्ये शासकीय योजना, अंमलबजावणी संदर्भात बैठक सुरु आहे. या बैठकीतुन बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण या योजनेतील सगळ्या अटीशर्थी काढून टाकल्या आहेत. रहिवासी दाखला आणि उत्पनाचा दाखल्यासाठी रांग लावायची गरज नाही. त्याऐवजी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड द्यावे. आणि ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही त्यांनी सेल्फ सर्टीफिकेशन करायचं आहे. तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, असे फडणवीसांनी सांगितले आहे. ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्यासाठी नाही तर आत घेण्यासाठी असल्याचेही फडणवीसांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : मुंबईत 1 कोटीचा फ्लॅट, ऑडी कार..., अट्टल चोराची लाईफस्टाईल पाहून पोलीस थक्क!

या योजनेत सध्या ऑफलाईन, अॅपवरही फॉर्म भरले जातायत. या दरम्यान फॉर्म भरताना बँकेचे अकाऊंट नंबर लिहताना चुक करू नका, नाहीतर पैसै जमा होणार नाहीयेत, असे देखील फडणवीसांनी सांगितले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांनाही टोला लगावला. विरोधक सावत्र भावासारखे आपल्या योजनेचा विरोध करतात आणि सख्खे भाऊ असल्याचा आवं आणतात. पण आता यांचीच लोक गावागावात फॉर्म घेऊन उभे आहेत.  त्यांच्यात खिशातून पैसे देणार आहेत, असे घरोघरी फिरु लागले आहे, त्यामुळे अशा बेगडी भावांपासून सावध राहावे लागेल, असा सल्ला देखील फडणवीसांनी महिलांना दिला. 

सकाळी 9 वाजता येऊन ते काय वेड वाकडं बोलून जातील दिवसभर त्या वेड्या वाकड्यावर माध्यम चालतील. या ट्र्रॅपमध्ये फसण्याची गरज नाही. आपण जे काम केलं आहे त रोज बोललं पाहिजे. वारंवार बोललं पाहिजे. पब्लिक मेमरी शॉर्ट असते, ते काल बोलले आज विसरतात, जे चांगलं केलंय ते रोज सांगा, असा सल्ला देखील फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला. 

    follow whatsapp